mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

वाळूच्या टिपरला अडवून सहा लाखांची मागणी : Sand tipper intercepted; demand made for six lakhs.

शेअर करा :

Sand tipper intercepted; demand made for six lakhs. : वाळूच्या टिपरला अडवून सहा लाखांची मागणी; मारहाणीची धमकी दिल्याचा आरोप

Sand tipper intercepted; demand made for six lakhs.
आरोपी

किनगाव जट्टू, दि. ३० : लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू ते खापरखेड लाड रोडवरील नदीपुलाजवळ एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळूच्या टिपरला अडवून सहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली असून, शिवीगाळ व मारहाणीची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी किनगाव जट्टू येथील अमोल प्रभाकर पालकर याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेबाबत दुर्गेश दिलीप अवचार (वय २५, रा. कळमेश्वर, ता. मेहकर) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, देवी तुळजाई रिअल इस्टेट कंपनीच्या खापरखेड लाड शिवारातील वाळू स्टॉक पॉईंटवरून शासनाच्या नियमानुसार रॉयल्टी भरून वाळूची वाहतूक टिपर वाहनाने सुरू आहे. तक्रारदार हे वाळूच्या रॉयल्टीची पावती देण्याचे काम करतात.

२९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी वाळू वाहतूक सुरू असताना, एका टिपर चालकासोबत दोन ब्रास वाळू घेऊन मेहकरकडे जात असताना, खापरखेड लाड ते किनगाव जट्टू रोडवर आरोपी अमोल पालकर याने वाळूचा टिपर अडवला, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर संबंधित वाहन ताब्यात घेऊन, तक्रारदाराला फोन करून “तू कंपनीचा मॅनेजर आहेस, वाळूच्या स्टॉक पॉईंटवरून वाहन का जाऊ देतोस?” असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच “मला सहा लाख रुपये तुझ्या मालकाकडून पाहिजेत,” अशी मागणी करून पैसे न दिल्यास वाहन अडवण्याची तसेच मारहाण करण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या घटनेमुळे आपल्याला जीवितास भीती निर्माण झाल्याचेही तक्रारदाराने पोलिसांना सांगितले आहे. तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीबी पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, घटनेची पुढील पोलीस तपासणी सुरू आहे. दरम्यान, तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top