mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

रेतीच्या टिप्पर अडवून सहा लाखांची मागणी : Sand tipper intercepted; demand made for six lakhs

शेअर करा :

Sand tipper intercepted; demand made for six lakhs : किनगाव जट्टू : लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू ते खापरखेड लाड रोडवरील नदीपुलाजवळ रेतीच्या टिपरला अडवून सहा लाख रुपयांची मागणी करून शिवीगाळ व मारहाणीची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी किनगाव जट्टू येथील अमोल प्रभाकर पालकर याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


Sand tipper intercepted; demand made for six lakhs

मारहाणीची धमकी दिल्याचा आरोप : किनगाव जट्टू येथील अमोल पालकरविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल


किनगाव जट्टू  : लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू ते खापरखेड लाड रोडवरील नदीपुलाजवळ रेतीच्या टिपरला अडवून सहा लाख रुपयांची मागणी करून शिवीगाळ व मारहाणीची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी किनगाव जट्टू येथील अमोल प्रभाकर पालकर याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत दुर्गेश दिलीप अवचार (वय २५, रा. कळमेश्वर, ता. मेहकर) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, देवी तुळजाई रिअल इस्टेट कंपनीच्या खापरखेड लाड शिवारातील रेती स्टॉक पॉईंटवरून शासनाच्या नियमानुसार रॉयल्टी भरून रेती टिपर वाहनाने वाहतूक सुरू आहे. तक्रारदार हे रेतीच्या रॉयल्टीची पावती देण्याचे काम करीत असल्याचे नमूद आहे.

२९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी रेती वाहतूक सुरू असताना एका टिपर चालकासोबत दोन ब्रास रेती घेऊन मेहकरकडे जात असताना खापरखेड लाड ते किनगाव जट्टू रोडवर आरोपी अमोल पालकर याने रेतीचा टिपर अडविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर संबंधित वाहन ताब्यात घेऊन, तक्रारदाराला फोन करून “तू कंपनीचा मॅनेजर आहेस, रेतीचे स्टॉक पॉईंटवरून वाहन का जाऊ देतोस?”, असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच “मला सहा लाख रुपये तुझ्या मालकाकडून पाहिजेत”, अशी मागणी करून पैसे न दिल्यास वाहन अडविण्याची तसेच मारहाण करण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या घटनेमुळे आपल्याला जीवितास भीती निर्माण झाल्याचेही तक्रारदाराने पोलिसांना सांगितले आहे. तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 126(2), 308(2), 352 आणि 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top