mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

एसटी स्थानक परिसरात खासगी वाहनांवर जप्तीची कारवाई : Action taken to impound private vehicles in the ST bus station area.

शेअर करा :

Action taken to impound private vehicles in the ST bus station area. : बुलढाण्यात अवैध वाहतुकीला लगाम: एसटी स्थानक परिसरात खासगी वाहनांवर जप्तीची कारवाई

Action taken to impound private vehicles in the ST bus station area.


बुलढाणा : जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित व कार्यक्षम बनवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. प्रियंका नारनौरे यांच्या विशेष आदेशानुसार, बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक आणि आरटीओ प्रशासनाने संयुक्तपणे एक धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील खाजगी ट्रॅव्हल्स माफिया, अवैध वडाप आणि ऑटो चालकांचे धाबे दणाणले आहेत.

Action taken to impound private vehicles in the ST bus station area.


एसटीच्या उत्पन्नात विक्रमी वाढ

एसटी महामंडळाच्या हक्काच्या प्रवाशांची पळवापळवी थांबवण्यासाठी आणि सामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या महिन्यात ५ ते १५ जून दरम्यान राबवलेल्या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात ३०६ अवैध वाहनांवर कठोर कारवाई करण्यात आली होती, ज्यातून ४ लाख रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला. या संयुक्त कारवाईचा थेट परिणाम म्हणून बुलढाणा एसटी विभागाच्या उत्पन्नात तब्बल ७४ लाख रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे. एसटीचे उत्पन्न बुडवणाऱ्या अवैध वाहतूकदारांचे कंबरडे मोडण्यात या मोहिमेला मोठे यश आले आहे.

Action taken to impound private vehicles in the ST bus station area.


मोहिमेचा दुसरा टप्पा अधिक तीव्र

या यशानंतर प्रशासनाने मोहिमेचा दुसरा टप्पा अधिक तीव्र आणि आक्रमक केला आहे. १ जुलै ते १० जुलै दरम्यान राबवण्यात आलेल्या या दुसऱ्या टप्प्यात अवघ्या काही दिवसांत २७० नियमबाह्य वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या कारवाई अंतर्गत संबंधित वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणावर दंड जागेवरच वसूल करण्यात आला आहे. ही मोहीम येथेच न थांबता यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुख्य ठळक मुद्दे:

• पहिला टप्पा: ३०६ वाहनांवर कारवाई, ४ लाखांपेक्षा जास्त दंड वसूल.
• एसटीला फायदा: एसटी महामंडळाच्या उत्पन्नात ७४ लाख रुपयांची विक्रमी वाढ.
• दुसरा टप्पा: अवघ्या १० दिवसांत २७० काळी-पिवळी, ट्रॅव्हल्स आणि ऑटो वाहनांवर कठोर कारवाई, ४ लाखांवर अधिक दंड वसूल.
• प्रतिबंधित क्षेत्र: एसटी बस स्थानकापासून २०० मीटर परिसरात खाजगी वाहनांना पूर्णपणे बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास आता थेट ‘जप्ती’ होणार.
• विशेष नोंद: ‘नो पार्किंग झोन’ मध्ये अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याची ही धडक मोहीम यापुढेही सतत सुरू राहणार.

सुरक्षित प्रवासासाठी प्रशासनाचे आवाहन

खाजगी वाहनांच्या अनिर्बंध गर्दीमुळे मुख्य रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी आणि महिला प्रवाशांची होणारी अडवणूक खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम पोलीस आणि आरटीओ प्रशासनाने दिला आहे. एसटी स्थानक परिसर पूर्णपणे मोकळा आणि सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी व प्रवाशांनी देखील अधिकृत एसटी बसचाच वापर करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ही मोहीम केवळ दंड वसूल करण्यापुरती मर्यादित नसून, प्रवाशांना सुरक्षित आणि सुलभ प्रवास उपलब्ध करून देण्याच्या व्यापक उद्दिष्टाने राबवली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top