Adv. Kailash Kadam appointed as National Secretary of Bhim Army : शिव, फुले, शाहू ,आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते ॲड . कैलास कदम यांची भीम आर्मी भारत एकता मिशन महाराष्ट्र राज्य सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

बुलढाणा : शिव, फुले, शाहू ,आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते ॲड . कैलास कदम यांची भीम आर्मी भारत एकता मिशन महाराष्ट्र राज्य सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष तथाआझाद समाज पार्टी (कांशीराम) ॲड . चंद्रशेखर आझाद यांच्या मार्गदर्शनामध्ये भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे यांनी एका नियुक्तीपत्रद्वारे राज्य सचिवपदी ॲड. कैलास कदम यांची नियुक्ती केली आहे. भीम आर्मी भारत एकता मिशन ही सामाजिक संघटना देशामध्ये अतिशय झपाट्याने वाढत आहे. संघटना वाढीसाठी ही जबाबदारी ॲड. कदम यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ॲड. कदम हे बुद्ध, फुले, शाहू , आंबेडकर या महापुरुषांच्या विचारधारेवर काम करणारे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी वकिलीच्या माध्यमातून अनेक शोषित, पीडित, तरुण, महिला, वृद्ध वर्गांना न्याय देण्याचे सतत कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांच्यावर भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेची महाराष्ट्र सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.


