mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

वाचाल तर वाचालचा संदेश देत ज्ञानदानाची भीमजयंती : Bhimjayanti of enlightenment

शेअर करा :

Bhimjayanti of enlightenment : चिखली तालुक्यातील वरखेड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील बाल वाचनालयासाठी ग्रामस्थांनी लोकसहभागातून शंभर विविध महापुरुषांची व अन्य पुस्तके खरेदी करून भेट देत ज्ञानरुपी भीमजयंतीचा सोहळा साजरा केला.


जिल्हा परिषद शाळेला पुस्तके दिली भेट : वरखेडवासीयांचे ज्ञानाच्या अथांग सागरास अनोखे अभिवादन

Bhimjayanti of enlightenment
वरखेड येथील आदर्श शाळेला पुस्तके भेट देताना गावकरी

चिखली : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील सर्वच घटकांसाठी शिक्षण किती महत्त्वाचे आहे, हे सांगितले. ‘वाचाल तर वाचाल’ हा त्यांचा संदेश शिक्षणासाठी प्रवृत्त करतो. चिखली तालुक्यातील वरखेड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील बाल वाचनालयासाठी ग्रामस्थांनी लोकसहभागातून शंभर विविध महापुरुषांची व अन्य पुस्तके खरेदी करून भेट देत ज्ञानरुपी भीमजयंतीचा सोहळा साजरा केला. ज्ञानाचे अथांग सागर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.

आपल्या व परिसरातील पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे, गुणवत्ता वाढावी यासाठी पालकांनीदेखील पुढाकार घेतला आहे. अनावश्यक खर्चामध्ये कपात करून शाळेतील पुस्तकांच्या खजिन्यात भर पाडण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद आदर्श शाळेत दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून पालकांचादेखील उत्साह वाढला आहे. मुख्याध्यापक शरद बंगाळे यांच्यासह सहकारी शिक्षकदेखील विद्यार्थी घडविण्यासाठी जीवतोड मेहनत घेत आहेत.

ही आदर्श शाळा सर्वत्र परिचित आहे. या शाळेने बालवयातच विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाल वाचनालय सुरू केले आहे. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी झाली. मात्र, वरखेड येथील गावकऱ्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने जयंती साजरी करण्याचे ठरविले. त्यासाठी लोकवर्गणी करून बाल वाचनालयासाठी शंभर पुस्तके खरेदी करण्यात आली. बाबासाहेबांनी उद्गारलेले ‘वाचाल तर वाचाल’ हे वाक्य सार्थ ठरविण्यासाठी गावकऱ्यांनी अनावश्यक खर्चात कपात केली आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी, यासाठी पुस्तके भेट दिली. खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आल्याच्या प्रतिक्रिया यावेळी उमटल्या. या उपक्रमाचा आदर्श अन्य शाळा आणि गावांमध्येदेखील घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ही बातमी वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : लोणारमध्ये ‘डार्क स्काय’ खगोल दर्शन महोत्सवाची सुरुवात

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने शरद गवई, अनिल गवई उकण्डराव गवई यांनी प्रतिनिधिक स्वरूपात शाळेला पुस्तके भेट दिली. यावेळी मुख्याध्यापक शरद बंगाळे व शिक्षक दिलीप खरात, भागवत पाटील फितवे, अनिल सोरमारे, ज्ञानेश्वर शेजोळ, गजानन आहेर, गजानन अहिरे, दयालसिंग जाधव, लक्ष्मण ठेंग, राजेश चौरे, विनोद ठाकरे, रवींद्र महाडिक, मंगेश झगरे, शुभम बुरुकुल, समाधान कौसे उपस्थित होते. ज्येष्ठ शिक्षक रामाप्पा फितवे यांनी शाळेच्या वतीने सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top