Biker killed in Bolero collision : बोलेरोच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

चिखली : चिखली ते मेहकर मार्गावर कोलारा फाट्याजवळ मालवाहू बोलेरोने दुचाकीला धडक दिल्याने देऊळगाव घुबे येथील रहिवासी जागीच ठार झाला. १८ एप्रिलच्या सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
विनोद एकनाथ चेके (वय ४०) असे मृतकाचे नाव आहे. देऊळगाव घुबे येथील तो रहिवासी होता विनोद दुचाकीने चिखली येथून मेहकरला निघाला होता. कोलारा फाट्याजवळ सकाळी अकराच्या सुमारास एमएच-२८-बीबी-३५६१ क्रमांकाच्या बोलेरोने त्याच्या दुचाकी (क्रमांक एमएच-२८-बीपी-०५९२) ला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की विनोदचा जागीच मृत्यू झाला. बोलेरो पिकअपच्या मागील चाकाचा टायर फुटला. चिखली पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेमुळे देऊळगाव घुबे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


