Villagers mass suicide : दत्तपूर ग्रामपंचायतअंतर्गत फजलपूर-तांडा येथे चालू असलेले स्टोनक्रशर व खनिपट्टा गावकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरला आहे. यामुळे धूळधाण झाली आहे. पिकांवरही परिणाम झाला आहे. हा पट्टा बंद करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

आठ दिवसच प्रशासनाच्या हाती : दत्तपूर-अफजलपूर-तांडा येथील स्टोनक्रशर व खनिपट्टा उठला मुळावर
बुलढाणा : दत्तपूर ग्रामपंचायतअंतर्गत फजलपूर-तांडा येथे चालू असलेले स्टोनक्रशर व खनिपट्टा गावकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरला आहे. यामुळे धूळधाण झाली आहे. पिकांवरही परिणाम झाला आहे. हा पट्टा बंद करावा तसेच नवीन कोणत्याही स्टोनक्रशर व खनिपट्टाला परवानगी देवू नये, अशी मागणी अफजलपूर-तांडा गावकऱ्यांनी केली आहे. तत्काळ निर्णय न झाल्यास २७ एप्रिल रोजी सामूहिक आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
यासंदर्भात गावकऱ्यांनी बुलढाणा तहसीलदार विठ्ठल उमरे यांना निवेदन सादर केले आहे.
दत्तपूर ग्रामपंचायतअंतर्गत अफजलपूर-तांडा गावालगत स्टोनक्रशर व खनिपट्टा चालू आहे. त्यासाठी होणाऱ्या टिप्परच्या वाहतुकीमुळे अफजलपूर-देऊळघाट व दत्तपूर-अफजलपूर (तांडा) रस्ता पूर्णतः खराब झाला आहे. रस्तावरती मोठ-मोठ खड्डे निर्माण झाले आहे. त्यामुळे दररोज अपघात होवून गावकरी जखमी होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. नुकताच शासनाने अडीच कोटी रुपयांचा निधी खर्च करून अफजलपूर-देऊळघाट रस्ता काम केले. परंतु सदर स्टोनक्रशरसाठी होणाऱ्या टिप्परच्या अवैध वाहतुकीने रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. विहिरीची पाणी पातळी खालवली आहे. तसेच मोठ्या प्रमणात धूळ देखील उडत आहे व यामुळे शेतीची पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्याचबरोबर पाण्यासाठी हाल होत आहे.


