mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

वनपट्टाधारक शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी नोंदणी मोहीम : Farmer ID registration campaign for forest land holders

शेअर करा :

Farmer ID registration campaign for forest land holders : राज्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी नोंदणीची विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून, ही नोंदणी नागरी सुविधा केंद्रामार्फत राज्यभर राबविण्यात येत आहे.


Farmer ID registration campaign for forest land holders
संग्रहित फोटो

सीएससीमार्फत मोफत सेवा

बुलढाणा : राज्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी नोंदणीची विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून, ही नोंदणी नागरी सुविधा केंद्रामार्फत राज्यभर राबविण्यात येत आहे. या नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात डिजिटल कृषी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. त्यानुसार, कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.
वनहक्क अधिनियम २००६ अंतर्गत अनुसूचित जमाती व पारंपरिक वननिवासी समुदायांना त्यांच्या वनजमिनीवरील हक्क प्रदान करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर वनपट्टाधारक शेतकऱ्यांची फार्मर आयडी नोंदणी सुलभ करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जवळील सीएससी केंद्रावर आवश्यक कागदपत्रांसह भेट देऊन तात्काळ फार्मर आयडी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

गावकरी करणार आत्मघात

फार्मर आयडी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजना, अनुदान, पीकविमा, नैसर्गिक आपत्ती सहाय्य तसेच इतर डिजिटल कृषी सेवांचा लाभ सहज मिळणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top