mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

रोल्स रॉयल वाहनात साकारला बाबासाहेब-माता रमाईंचा देखावा : Babasaheb-Mata Ramai scene recreated in a Rolls Royal vehicle

शेअर करा :

Babasaheb-Mata Ramai scene recreated in a Rolls Royal vehicle : महामानव, भारतरत्न, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी निघालेल्या सार्वजनिक मिरवणुकीमध्ये इंदिरानगर, यशवंतनगर, तानाजीनगर या वॉर्डातील चित्ररथ खास आकर्षण ठरला.


Babasaheb-Mata Ramai scene recreated in a Rolls Royal vehicle
ब्रिटिशकालीन वाहनात साकारलेला बाबासाहेब आणि माता रमाई यांचा जिवंत देखावा

ब्रिटिशकालीन गाडीतील जिवंत प्रतिकृती ठरली भीमजयंतीचे आकर्षण 

बुलढाणा : महामानव, भारतरत्न, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी निघालेल्या सार्वजनिक मिरवणुकीमध्ये इंदिरानगर, यशवंतनगर, तानाजीनगर या वॉर्डातील चित्ररथ खास आकर्षण ठरला. या नगरातील युवकांनी ‘रोल्स रॉयल’ या ब्रिटिशकालीन चारचाकी गाडीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा जिवंत देखावा सादर करून मिरवणूक काढली. ही प्रतिकृती यंदाच्या मिरवणुकीचे विशेष वैशिष्ट्य ठरली.
मिलिंद इंगळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर भीमा मिलिंद इंगळे यांनी माता रमाई यांची भूमिका साकारली. चित्र रथावर बाबासाहेब व माता रमाई यांचे हुबेहूब दर्शन होत असल्याचा प्रत्यय येत असल्याने अनेकांनी या नगरातील युवकांचे कौतुक केले. विशेष म्हणजे ही गाडी खास बाहेरगावाहून आणण्यात आली होती. जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सागर दीपक जाधव यांच्या नेतृत्वात ही मिरवणूक काढण्यात आली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top