mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

प्रतापपूर येथे गर्भलिंग निदान करताना बोगस डॉक्टर रंगेहात पकडला : Bogus doctor caught red-handed while performing prenatal sex determination in Pratappur.

शेअर करा :

Bogus doctor caught red-handed while performing prenatal sex determination in Pratappur. : परतापूर येथे गर्भलिंग निदान करताना बोगस डॉक्टर रंगेहात पकडला

Bogus doctor caught red-handed while performing prenatal sex determination in Pratappur.


आसिफ शाह 

मेहकर : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात, गर्भलिंग निदानाच्या गंभीर आणि अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. दिनांक 27 जून 2026 रोजी, अकोला मंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक मा. वाकचौरे सर यांच्या आदेशानुसार, बुलढाणा जिल्ह्याचे शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एक सापळा रचण्यात आला. या कारवाईत मेहकर तालुक्यातील प्रतापपूर येथे एका बोगस डॉक्टरला गर्भलिंग निदान करताना रंगेहात पकडण्यात आले.

या कारवाईसाठी डॉ. सुनिता हिवसे, वैद्यकीय अधीक्षक, शहर पोलीस निरीक्षक आलेवार सर, बिरांजे सर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड सर यांच्यासह त्यांच्या टीममधील कॉन्स्टेबल लक्ष्मण कटक, शिवनकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप भोंडाने, पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद परसुवाले, पोलीस कॉन्स्टेबल केशव अवचार, महिला पोलीस कॉन्स्टेबल सरकटे यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच, रुग्णालयातील आरोग्य विभागाची टीम, ज्यात श्रीमती मंगला वायाळ (सिस्टर),  प्रशांत बोरे (अधिपरिचारिका), आणि श्री. वायाळ (वरिष्ठ लिपिक) यांचा समावेश होता, यांनीही या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

प्रतापपूर येथील रसाळ यांच्या घरी छापा टाकण्यात आला, जिथे अनिल रामदास सोनुने नावाचा बोगस डॉक्टर एका महिलेचे गर्भलिंग निदान करताना मशीनसह पकडला गेला. त्याच्याकडून एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आली. ही मशीन गर्भलिंग निदानासाठी वापरली जात होती. सोनुने या बोगस डॉक्टरला आणि त्याचे साक्षीदार रसाळ यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या घरातून इतर औषधे आणि इंजेक्शनही आढळून आले, जे जप्त करण्यात आले आहेत.

आरोग्य विभागाच्या PCNDT (Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques) विभागाने सकाळी सहा वाजल्यापासून आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. मेहकर तालुका हा मागील अनेक वर्षांपासून गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपातासाठी कुप्रसिद्ध आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असल्याने येथे अनेक गैरप्रकार सर्रासपणे सुरू असतात. यापूर्वीही मेहकर येथे झालेल्या कारवाईने राज्यभर खळबळ उडवून दिली होती. डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गतही गर्भलिंग निदान करण्याच्या तयारीत असलेल्यांना पकडण्यात आले होते, तर वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील कारवाईत एक आरोपी डोणगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले होते.

अशा परिस्थितीत, 27 जून रोजी दुपारी मेहकरपासून जवळच असलेल्या प्रतापपूर गावात एका घरात पोर्टेबल मशीनद्वारे गर्भलिंग निदान सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर, आरोग्य विभागाच्या PCNDT पथकाने मेहकर पोलिसांच्या मदतीने छापा टाकून या बोगस डॉक्टरला रंगेहात पकडले. ही कारवाई गर्भलिंग निदानाच्या अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या घटनेमुळे समाजात अशा गैरप्रकारांविरोधात जनजागृती वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

Bogus doctor caught red-handed while performing prenatal sex determination in Pratappur.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top