mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

बहिणीचा खून भावास जन्मठेप : Brother sentenced to life imprisonment for sister’s murder

शेअर करा :

Brother sentenced to life imprisonment for sister’s murder : बहिणीचा खून; भावास जन्मठेप 

Brother sentenced to life imprisonment for sister's murder
आरोपी सागर त्र्यंबक जाधव

दारू पिण्यामुळे  घेतला जीव : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांनी ठोठावली शिक्षा

बुलढाणा, दि. १२ : बहीण दारू पिण्याच्या सवयीची असल्याने समाजात बदनामी होत असल्याच्या कारणावरून बहिणीची गळा आवळून व चाकूने मारून हत्या करणाऱ्या सख्ख्या भावाला येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सागर त्र्यंबक शर्मा (जाधव) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपी भावाचे नाव आहे. तर त्याने खून केलेल्या बहिणीचे नाव अंकिता (वय २८) असे आहे. शहरातील विदर्भ हाउसिंग सोसायटीत राहणाऱ्या सागरने २८ जुलै २०२० रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास अंकिता ही दारू पिण्याच्या सवयीची असल्यामुळे त्याची समाजामध्ये व मित्रांमध्ये बदनामी होत असल्याचा राग मनात धरून केबलवायरने तिचा गळा आवळला. नंतर चाकूने मारहाण करून खून केला. घटनेनंतर तिचा मृतदेह बाथरूममध्ये ठेवला होता. त्यापूर्वी आरोपी सागरने त्याची आई फिर्यादी कोकिळा त्र्यंबक जाधव व मृत अंकिताच्या मुलांना खून करण्याच्या उद्देशाने संध्याकाळच्या वेळेस घराबाहेर काढून दिले होते. कोकिळा या मृत अंकिताच्या मुलासह तिची दुसरी मुलगी मीरा उजेड हिच्या बुलढाणा येथील घरी वास्तव्यास गेली होती. २९ जुलै २०२० रोजी सकाळी आरोपी सागर हा स्वत: बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि खुनाची कबुली दिली. त्याने त्याची आई कोकिळा यांना अंकिता हिचा केबलवायरने गळा आवळून खून केल्याचे फोनवर सांगितले होते. त्यामुळे कोकिळा जाधव तातडीने हजर झाल्या. २९ जुलै २०२० रोजी पोलिसांनी घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा केला. घटनास्थळावर हजर फॉरेन्सिक लॅब टीममार्फत भौतिक पुरावे गोळा करण्यात आले होते. त्यानंतर आरोपी सागरची आई स्कोकिळा यांनी दिलेल्या तक्रारीवरून सागरला गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. ३१ जुलै २०२० रोजी आरोपीने गुन्ह्यात वापरलेला चाकू व कपडे जप्त केले. केबलवायरही जप्त करण्यात आली होती. तपासादरम्यान तपास अधिकाऱ्यांनी विविध जप्ती पंचनामे करून व महत्त्वाच्या साक्षीदाराचे जबाब नोंदविले. जप्त केलेला मुद्देमाल वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये पाठवून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर व न्यायालयाने आरोपीवर दोष ठेवल्यानंतर गुन्हा सिद्ध होण्यासाठी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील व्ही.एल. भटकर यांनी एकूण आठ साक्षीदार तपासले. त्यापैकी आरोपीची आई कोकिळा जाधव यांची साक्ष तसेच घटनास्थळावरील व जप्ती पंचनाम्यावरील पंच, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमर सावले व तपास अधिकारी पीएसआय अमित जाधव या सर्वांची साक्ष महत्त्वाची ठरली.

Brother sentenced to life imprisonment for sister's murder
सरकारी वकील ॲड. वसंत भटकर

सरकारी वकिलांचा प्रभावी युक्तीवाद

आरोपीविरुद्ध दोष सिद्ध होण्याचे दृष्टीकोनातून जिल्हा सरकारी वकील व्ही.एल. भटकर यांनी आरोपीस कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी प्रभावी युक्तिवाद केला. तसेच त्यानुषंगाने न्यायालयाने आरोपीस भादंवि कलम ३०२ नुसार जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंडाची शिक्षा असा निर्णय दिला.

 

पीडितेच्या भरपाईसाठी विधि सेवाकडे प्रकरण

पीडितेस नुकसानभरपाई मिळण्याच्या दृष्टीकोनातून प्रकरण जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आले आहे. तर सदर प्रकरणामध्ये तपास पीएसआय अमित राजाराम जाधव यांनी केला होता. तर सहायक पोलीस उपनिरीक्षक किशोर कांबळे यांनी कोर्ट पैरवी म्हणून सहकार्य केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top