mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा प्रशासन सज्ज : Buldhana District Administration Prepared Amidst Pharmacists’ Strike

शेअर करा :

Buldhana District Administration Prepared Amidst Pharmacists’ Strike : औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा प्रशासन सज्ज; औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना

Buldhana District Administration Prepared Amidst Pharmacists' Strike


बुलढाणा, दि. १३ मे : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या वतीने येत्या बुधवार, दि. २० मे २०२६ रोजी देशव्यापी एक दिवसीय औषध विक्रेता बंदची घोषणा करण्यात आली आहे. या बंदमुळे जिल्ह्यातील नागरिकांना अत्यावश्यक औषधांचा पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे.

अन्न व औषध प्रशासन, बुलढाणा यांच्या सहाय्यक आयुक्त गजानन प्र. घिरके यांनी सांगितले की, देशातील ठोक आणि किरकोळ औषध विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे. नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन पूर्ण सतर्क झाले आहे.

सह आयुक्त (औषधे), मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते, रुग्णालयांशी संलग्न औषध दुकाने आणि २४ तास कार्यरत औषध दुकानांशी समन्वय साधण्यात येत आहे. अत्यावश्यक औषधांचा साठा पुरेसा ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस प्रशासन, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच खासगी व निमसरकारी रुग्णालयांशी सातत्याने संपर्क ठेवून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. प्रत्येक तालुका आणि गाव पातळीवर काही औषध दुकाने सुरू ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. औषध पुरवठ्यात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास जिल्ह्यात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

नागरिक खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकतात:

९८५०१५०६८७

७७२००४५०८५

९९२२८९९९५८

८२६२८७८८९५

ई-मेल: acfdabuldhana@gmail.com

प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आणि आवश्यकतेनुसार वरील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top