mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

दोनशे लिटरचा साठा करणाऱ्या पेट्रोलपंप चालकावर गुन्हा : Case Registered Against Petrol Pump Operator for Stockpiling 200 Liters

शेअर करा :

Case Registered Against Petrol Pump Operator for Stockpiling 200 Liters : दोनशे लिटरचा साठा करणाऱ्या पेट्रोलपंप चालकावर गुन्हा लोणारातील अंजनीत पुरवठा विभागाची कारवाई

Case Registered Against Petrol Pump Operator for Stockpiling 200 Liters


बुलढाणा : इंधनाच्या टाक्याशिवाय अतिरिक्त दोनशे लिटर डिझेल बॅरलमध्ये भरून टीनशेडमध्ये साठा करणाऱ्या लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द येथील एका पेट्रोलपंप चालकाविरुद्ध पुरवठा विभागाच्या तक्रारीवरून मेहकर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

मेहकर ते जालना महामार्गावर अंजनी खुर्द येथे कालिंका माता पेट्रोल पंप आहे. पेट्रोल, डिझेल घेण्यासाठी येथे गर्दी होती. परंतु पंपमालकाने मिळणाऱ्या इंधनातून ग्राहकांना न देता दोनशे लिटर डिझेलचा एका बॅरलमध्ये साठा करून ठेवला. टीनशेडमध्ये हे डिझेल लपविण्यात आले. शेतकऱ्याला केलेली मारहाण आणि अवैध डिझेल साठा करून ठेवल्या जात असल्याच्या आरोपाची पडताळणी करण्यासाठी लोणारचे तहसीलदार भूषण पाटील हे पेट्रोल पंपावर पोहोचले. केलेल्या पाहणीत ड्रममध्ये ठेवलेले दोनशे लिटर डिझेल आढळून आले. पुरवठा निरीक्षण अधिकारी आरती दांडगे यांच्या फिर्यादीवरून १८ मे रोजी कालिंका माता पेट्रोल पंप संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पंपावर शेतकऱ्यास मारहाण; कर्मचाऱ्यावर गुन्हा

अंजनी खुर्द येथील कालिंका पेट्रोल पंपावर उद्धव पिसे या शेतकऱ्याला १७ मेच्या सकाळी सात वाजता पंपावरील कर्मचाऱ्यांनी इंधनाच्या वादातून मारहाण केली होती. या प्रकरणी दोन्ही कर्मचाऱ्यांवरदेखील मेहकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top