mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

पत्नीवरील लैंगिक अत्याचारास मदत पती सासूसह तिघांविरुद्ध गुन्हा : Case registered against three persons—including the husband and mother-in-law—for abetting the sexual assault of the wife.

शेअर करा :

Case registered against three persons—including the husband and mother-in-law—for abetting the sexual assault of the wife. : पत्नीवरील लैंगिक अत्याचारास मदत पती, सासूसह तिघांविरुद्ध गुन्हा

Case registered against three persons—including the husband and mother-in-law—for abetting the sexual assault of the wife.


नात्याला काळिमा फासणारी घटना; डोणगाव पोलिसांची कारवाई

 

डोणगाव : डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नातेसंबंधांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्वतःच्या पत्नीवर नात्याने दाजी असलेल्या व्यक्तीकडून कथित लैंगिक अत्याचार होण्यासाठी मदत केल्याप्रकरणी पती, सासू आणि मुख्य आरोपी अशा तिघांविरुद्ध डोणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. तक्रारीनुसार, पतीच्या बहिणीचा पती असलेला हिंगोली जिल्ह्यातील कन्हेरगाव नाका येथील आरोपी मागील सहा महिन्यांपासून तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून लैंगिक अत्याचार करीत होता.

यातील गंभीर बाब म्हणजे, पीडितेचा पती व सासू यांना या प्रकाराची माहिती असूनही त्यांनी मुख्य आरोपीस मदत केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच हा प्रकार कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही पीडितेने फिर्यादीत नमूद केले आहे.

या प्रकरणी डोणगाव पोलिसांनी अप. क्र. १८७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(१), ६४(२)(एम), ३५१(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top