mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

महिला बालविकास च्या लाचखोर संरक्षण अधिकाऱ्यास अटक  : Corrupt Protection Officer from the Women and Child Development Department arrested.

शेअर करा :

Corrupt Protection Officer from the Women and Child Development Department arrested. : महिला बालविकास’च्या लाचखोर संरक्षण अधिकाऱ्यास अटक 

Corrupt Protection Officer from the Women and Child Development Department arrested.


दिव्यांग अर्थसाह्य सुरू ठेवण्यासाठी घेतली लाच

 

बुलढाणा : शासनाकडून दिव्यांग मुलीस मिळणारे अर्थसाह्य चालू ठेवण्यासाठी १२ हजारांची लाच घेणाऱ्या महिला व बाल विकास विभागाच्या संरक्षण अधिकाऱ्यासह एका कंत्राटी कर्मचाऱ्याला जळगाव जामोद येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. २५ जूनला ही कारवाई करण्यात आली.

तुषार रमेश राणे (वय ३६) असे लाचखोर संरक्षण अधिकाऱ्याचे नाव आहे. तर लाचेसाठी प्रोत्साहन देणारा जगन्नाथ तुकाराम भिवटे (वय ४०) या दोघांविरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात कलम ७, १२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

तुषार राणे हा मलकापूर येथील महिला व बाल विकास विभागात संरक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्याच्याकडे संग्रामपूर येथील अतिरिक्त प्रभार आहे. तर दुसरा लाचखोर कर्मचारी जगन्नाथ तुकाराम भिवटे (वय ४०) हा नांदुरा येथील महिला व बाल विकास विभागात बहुउद्देशीय कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. राणे हा नांदुरा येथे वास्तव्याला आहे. तर भिवटे हा नांदुरा तालुक्यातील मामुलवाडी येथे राहतो.

तक्रारकर्त्याच्या मामाची मुलगी निराधार व दिव्यांग आहे. तिला शासनाच्या क्रांतीज्योती बालसंगोपन योजना व शासनाच्या विशेष योजनेतून टप्प्याटप्प्याने ४८ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळालेली होती. ही मदत मिळवून दिल्याचा मोबदला म्हणून व भविष्यात शासनाकडून आर्थिक लाभ मिळण्यास मदत करण्यासाठी तुषार राणे याने २४ हजार रुपये लाचेची मागणी केली. २४ जून रोजी नांदुरा येथील महिला व बाल विकास विभाग संरक्षण अधिकारी कार्यालयात पथकाने पडताळणी केली. राणे हा नांदुरा येथे असताना त्याने अर्थसाह्य मिळवून दिला होता. त्याचा मोबदला म्हणून व पुढे मदत मिळण्याकरिता राणेने लाच मागितल्याचे समोर आले. तर भिवटे याने प्रोत्साहित केले. २४ हजार लाच मागण्यात आली होती. त्यातील १२ हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्याचे ठरले. त्यासाठी जागा व तारीख निश्चित करण्यात आली. २५ जून रोजी सापळा जळगाव जामोद येथील तालुका शेतकरी खरेदी विक्री सहकारी समिती कार्यालयासमोर सापळा रचण्यात आला. १२ हजारांची लाच घेताच आरोपींवर कारवाई करण्यात आली.

अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, बुलढाण्याचे पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश पवार, पोलीस निरीक्षक विलास गुसिंगे, सहायक फौजदार श्याम भांगे, पोहेकॉ प्रवीण बैरागी, दीपक जाधव, अमोल झिने, जगदीश पवार, लक्ष्मीकांत इंगळे, गजानन गाल्डे, रतनगीर गीरी, प्रफुल्ल आमले, शैलेश सोनवणे, रणजित व्यवहारे, अनिता वारंगणे, नितीन शेटे, अर्शद शेख यांनी ही कारवाई केली.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top