mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

आग लागून सिलिंडरचा फुटले; वृद्ध महिलेचा मृत्यू : Cylinder burst; elderly woman dies

शेअर करा :

Cylinder burst; elderly woman dies : मलकापूर येथे घराला आग लागल्यानंतर गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाला.


Cylinder burst; elderly woman dies
आगीनंतर विखुरलेले घर

मलकापूर शहरातील दुर्घटना

मलकापूर : घराला आग लागल्यानंतर गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाला. मलकापूर शहरातील अशोकनगर भागात मंगळवार, १२ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

नर्मदाबाई लासुरकर (वय ८५) असे हृदयद्रावक घटनेत ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. बहीण आणि भाऊ असे दोघेच राहात होते. काही दिवसांपूर्वीच वृद्ध भावाचे निधन झाले. घटनेवेळी त्या घरात एकट्याच होत्या. घरातून धूर आणि आगीचे लोळ बाहेर येऊ लागल्याने धावाधाव केली. तोपर्यंत आग स्वयंपाकघरापर्यंत पसरून गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. घराबाहेर पडता न आल्याने नर्मदाबाई यांचा होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाने पोहोचल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top