mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

मलकापूर पांग्रा येथे अवैध वृक्षतोडीवर पोलिसांचा धाडसी प्रहार : Police Launch Bold Crackdown on Illegal Tree Felling at Malkapur Pangra

शेअर करा :

Police Launch Bold Crackdown on Illegal Tree Felling at Malkapur Pangra : मलकापूर पांग्रा येथे अवैध वृक्षतोडीवर पोलिसांचा धाडसी प्रहार वनविभागाकडून गुन्हा दाखल

Police Launch Bold Crackdown on Illegal Tree Felling at Malkapur Pangra
साखरखेर्डा पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आलेले वाहन

अमोल साळवे प्रतिनिधी : 

मलकापूर पांग्रा, दि. ११ : सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे काल मध्यरात्रीच्या सुमारास साखरखेर्डा पोलिसांनी अवैध वृक्षतोडीवर अत्यंत प्रभावी कारवाई करत, लाकडांनी भरलेला एक आयशर ट्रक जप्त केला. या घटनेने अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्यांना मोठा धक्का बसला असून, वनविभागाने तात्काळ वनगुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १० रोजी मध्यरात्री पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे हे मलकापूर पांग्रा बीट परिसरात गस्त घालत होते. पंडित नेहरू विद्यालयाजवळ काहीतरी संशयास्पद आवाज येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ त्या दिशेने पाहणी केली असता, एमएच २८ एन २८८२ या क्रमांकाच्या आयशर वाहनात निंब आणि बाभूळ यांसारख्या जंगली वृक्षांची लाकडे भरण्याचे काम काही व्यक्ती करत असल्याचे त्यांना आढळले.

पोलिसांना पाहताच, लाकूड वाहतूक करणारे व्यक्ती घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, लाकूड वाहतुकीसाठी आवश्यक असलेला कोणताही परवाना किंवा वाहतूक पास गाडी मालकाकडे नव्हता. यामुळे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत, सदर आयशर वाहन ताब्यात घेतले आणि साखरखेर्डा पोलीस स्टेशन येथे जमा केले.

साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी जप्त केलेल्या आयशरची पाहणी केली आणि हे प्रकरण वनविभागाच्या ताब्यात दिले. वनविभागाने या प्रकरणी कोणतीही दिरंगाई न करता तात्काळ कारवाई केली आहे. आरोपी अनिस खा हुसेन खा पठाण, रा. देऊळगाव मही यांच्यावर वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या आयशरमध्ये सुमारे पाच टन आडजात जळतंन असल्याचे वनविभागाने सांगितले.

आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक लागली करा https://mahadesha.com/

या प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी मेहकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल फुके लोणार आणि वनरक्षक ज्ञानेश्वर आरू हे करत आहेत. वनरक्षक ज्ञानेश्वर आरू यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक आयशर आणि पाच टन आडजात जळतंन जप्त करण्यात आले असून, चालकावर वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, अवैध मार्गाने वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/

या कारवाईमुळे परिसरात अवैध वृक्षतोड करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या आणि वनविभागाच्या या संयुक्त कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी अशा प्रकारच्या कठोर उपाययोजनांची नितांत गरज असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top