mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

मजुरीच्या पैशांच्या वादातून दलित महिलेला मारहाण : Dalit woman assaulted over dispute regarding wages.

शेअर करा :

Dalit woman assaulted over dispute regarding wages. : मजुरीच्या पैशांच्या वादातून दलित महिलेला मारहाण;

Dalit woman assaulted over dispute regarding wages.

 


मलकापूर (पांग्रा) | अमोल साळवे

सिंदखेडराजा तालुक्यातील पांग्री उगले येथे मजुरीच्या पैशांच्या वादातून एका दलित महिलेला जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नव्हे तर संबंधित महिलेला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकरणी चौघांविरुद्ध किनगाव राजा पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पांग्री उगले येथील अनिता कडूबा निकाळजे वय ४५ यांनी याबाबत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, १२ जून २०२६ रोजी सायंकाळी मजुरीच्या पैशांवरून वाद निर्माण झाला. यावेळी आरोपींनी फिर्यादी महिलेला जातिवाचक शिवीगाळ करत अपमानित केले. त्यानंतर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी गजानन धनसिंग राठोड, जितेंद्र गजानन राठोड, जनाबाई गजानन राठोड आणि कोमल जितेंद्र राठोड सर्व रा. पांग्री उगले, ता. सिंदखेडराजा यांच्याविरुद्ध किनगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत संबंधित आरोपींवर कारवाई सुरू केली आहे. गुन्ह्याची नोंद पोलीस उपनिरीक्षक मोहन गिते यांनी केली असून, पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम करीत आहेत.

या घटनेमुळे पांग्री उगले परिसरात खळबळ उडाली असून, दलित महिलेवर झालेल्या कथित अत्याचाराच्या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top