Gas cylinder stolen from hospital : सिलिंडर न मिळण्याची भीती बाळगत अज्ञात चोरट्याने चक्क क्षय आरोग्य धाम (टीबी) हॉस्पिटलच्या स्वयंपाक घरातून गॅस सिलिंडर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

टीबी हॉस्पिटलचे स्वयंपाक घर फोडले
बुलढाणा : सिलिंडर न मिळण्याची भीती बाळगत अज्ञात चोरट्याने चक्क क्षय आरोग्य धाम (टीबी) हॉस्पिटलच्या स्वयंपाक घरातून गॅस सिलिंडर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
रात्रीच्या वेळी चोरट्याने टीबी हॉस्पिटलमधील स्वयंपाक घराची खिडकी व दरवाज्याची कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला. १७ गॅस सिलिंडरपैकी एक भरलेले सिलिंडर आणि साहित्य चोरून नेले. सोबतच तांब्याची ऑक्सिजन पाइपलाइनदेखील काढून नेली. हे प्रकरण पोलिसांत दाखल करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशील चव्हाण यांनी दिली.

आखाती देशांमध्ये भडकलेल्या युद्धाच्या झळा महाराष्ट्राला बसल्या आहेत. गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण होण्याच्या शक्यतेने एजन्सीजवर रांगा लागल्या आहेत. आपल्या घरचा गॅस कसा पेटेल, असा प्रश्न चोरट्यास पडला असेल म्हणून त्याने ही चोरी केली असावी अशी जनतेत चर्चा रंगली आहे.


