mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य अनावरण : Grand unveiling of the equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj

शेअर करा :

Grand unveiling of the equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य अनावरण.

मोहोज रुईखेड मायंबा : दि. ९ मार्च २०२६ रोजी चिखली विधानसभा मतदारसंघातील मोहोज रुईखेड मायंबा गाव आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्ती आणि राष्ट्रभक्तीच्या उत्साहाने दुमदुमले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ भव्य पुतळ्याचे विधिवत पूजन करून अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या हस्ते हा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला.

Grand unveiling of the equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj
सकाळपासूनच गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गावकरी, शिवप्रेमी नागरिक, युवक-युवती आणि माता-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीसह आणि “जय शिवराय जय महाराष्ट्र ” अशा जयघोषांच्या निनादात भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावातील रस्त्यांवरून ही मिरवणूक निघाली आणि पुतळ्याच्या स्थळी पोहोचल्यानंतर विधिवत पूजा-अर्चना केली. आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करून पुतळ्याचे अनावरण केले,
या सोहळ्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना मान्यवरांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम, स्वराज्याची संकल्पना आणि न्याय-स्वाभिमानाचा विचार आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतात. अशा स्मारकांमुळे नव्या पिढीला इतिहासाची जाणीव होईल आणि राष्ट्रभक्तीची भावना बळकट होईल. “महाराजांनी जनतेला स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचा मार्ग दाखवला. आज आम्ही त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प करतो,” असे भावपूर्ण शब्द उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मान्यवर:
शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, किसान सेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड,शिवसेना उपजिल्हा प्रमुख निलेश गुजर,उपतालुका प्रमुख मयूर पडोळ,शिवसेना तालुकाप्रमुख धनंजय बारोटे,सरपंच अनिल फेपाळे मोहोज, देवानंद दांडगे सागवन, विलास साखरे भडगाव, तुळशीराम दादा काळे मोंढाळा, माजी सभापती पंचायत समिती बुलढाणा सतीश वाघ तसेच संदीप ताठे, अनिल गावंडे, बाळू बिडवे, आशिष पाटोळे, आकाश चाकोते, आकाश राऊत, विठ्ठल ठेंग, गजानन तायडे, विजय साखरे, सतीश खडके, लहू साखरे, गणेश साखरे, परसराम साखरे, रामराव साखरे, दादाराव हेपाळे आणि उगले कुटुंबातील असंख्य सदस्यांसह पंचक्रोशीतील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भव्य कार्यक्रमामुळे परिसरात नवीन ऊर्जा आणि एकतेचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमानंतर सर्वांनी पुतळ्यास अभिवादन करत महाराजांच्या आदर्शांवर चालण्याचा प्रण केला. “जय शिवराय जय महाराष्ट्र” या घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top