Clashes between two groups over bursting of crackers after Indias win : भारत-न्यूझीलंडमध्ये सुरू असलेला अंतिम सामना पाहताना फटाके फोडल्यावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. खामगाव तालुक्यातील घारोड येथे ८ मार्चच्या रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली.

घारोड येथील घटना
खामगाव : भारत-न्यूझीलंडमध्ये सुरू असलेला अंतिम सामना पाहताना फटाके फोडल्यावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. खामगाव तालुक्यातील घारोड येथे ८ मार्चच्या रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली.
घारोडचे रहिवासी रामकृष्ण महादेव दुतोंडे (वय ४०)यांनी ८ मार्च रोजी रात्री सुमारे साडेदहा वाजता घरासमोर मोबाइलवर भारत-न्यूझीलंड फायनल सामना पाहून भारत जिंकल्याच्या आनंदात फटाके फोडले. यावरून झालेल्या वादात अल्ताफ शहा रफिक शहा, तौसिफ शहा रफिक शहा, आसिफ शहा रजाक शहा व रफिक शहा गुलाब शहा यांनी अंगावर धावून येत लोखंडी कुऱ्हाडीने दुतोंडे यांच्या डोक्यावर वार करून जखमी केले. त्यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), १३१, ३५२, ३५१ (२) (३), ३ (५) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
दुसऱ्या गटातील तौसिफ शहा रफिक शहा (वय २५) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, फटाक्यांच्या आवाजामुळे त्यांच्या लहान मुलीला त्रास होत असल्याने फटाके फोडू नका असे सांगितल्यावरून वाद झाला. त्यावेळी गोपाल वसंता दुतोंडे, गणेश वसंता दुतोंडे, एकनाथ दुतोंडे व रामकृष्ण महादेव दुतोंडे यांनी लोखंडी पट्ट्याने मारहाण केली. या प्रकरणी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले.


