mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

बुलढाणा ग्रामीण हद्दीत 5.78 लाखांचा गुटखा जप्त : Gutkha worth ₹5.78 lakh seized within Buldhana rural limits.

शेअर करा :

Gutkha worth ₹5.78 lakh seized within Buldhana rural limits. : बुलढाणा ग्रामीण हद्दीत 5.78 लाखांचा गुटखा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

Gutkha worth ₹5.78 lakh seized within Buldhana rural limits.


बुलढाणा, दि. 7 : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतूक व विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 5 लाख 78 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एक आरोपी ताब्यात घेण्यात आला असून त्याच्याविरुद्ध बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने प्रतिबंधित गुटखा विक्री व वाहतुकीवर विशेष मोहीम सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने दि. 7 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, एक व्यक्ती मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर (MH-28-ET-5300) या वाहनातून शासन प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पानमसाला वाहतूक करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देऊळघाट परिसरात सापळा रचून वाहन अडविले. तपासणीदरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटखा व सुगंधित पानमसाला आढळून आला. पोलिसांनी वाहनासह संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी शेख सलीम शेख इस्माईल (वय 59 वर्षे, रा. सैलानीनगर, चिखली) यास ताब्यात घेतले आहे.
जप्त मुद्देमाल शासन प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पानमसाला : ₹3,28,900 मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर वाहन : ₹2,50,000 एकूण जप्त मुद्देमाल : ₹5,78,900

या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बुलढाणा ग्रामीण पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा व अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या नेतृत्वात पोहेकॉ. दिपक लेकुरवाके, विजय वारुळे, अनुपकुमार मेहेर, राजेंद्र टेकाळे व अमोल वनारे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

प्रतिबंधित गुटखा विक्री व वाहतुकीविरोधातील ही कारवाई जिल्ह्यातील अवैध तंबाखू व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठा इशारा मानली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top