Hirkani cell set up at Bharosa Cell : महिलांना भरवसा देणाऱ्या भरोसा सेलमध्ये हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते उद्घाटन
बुलढाणा : महिलांना भरवसा देणाऱ्या भरोसा सेलमध्ये हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचे उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाच्या पर्वावर करण्यात आले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, बुलढाण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, मुख्यालय पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण पावरा, देऊळगाव राजा उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, तसेच भरोसा सेलच्या प्रभारी अधिकारी पीएसआय शिल्पा सुरगडे व भरोसा सेल येथील सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
हिरकणी कक्षाचा भरोसा असेल येथे येणारे माता, भगिनी यांना मोठा फायदा होईल. हिरकणी कक्षाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पीएसआय शिल्पा सुरगडे व भरोसा सेल येथील पोलीस स्टाफ यांनी मेहनत घेतले.


