Police Recruitment Guidance Camp : रायपूर येथे रविवार, ३ मे २०२६ रोजी सकाळी नऊ वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत पोलीस भरती विषयक आणि दहावी, बाारावीनंतर काय, या विषयावर मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे.

सम्राट युवा ग्रुपने केले आयोजन
बुलढाणा : तालुक्यातील रायपूर येथे सम्राट अशोक युवा ग्रुपच्या वतीने सर्व तरुण-तरुणी आणि विद्यार्थ्यांना आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. रविवार, ३ मे २०२६ रोजी सकाळी नऊ वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत पोलीस भरती विषयक आणि दहावी, बाारावीनंतर काय, या विषयावर मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे.
मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र पोलीस दलातील आशिष जाधव उपस्थित राहून पोलीस भरतीसंदर्भातील विविध आवश्यक बाबींवर प्रकाश टाकणार आहेत. याचा पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांना निश्चितच फायदा होणार आहे.
त्याचप्रमाणे दहावी व बारावीनंतर करिअरच्या विविध संधी बाबत प्रा. डॉ. सुभाष राऊत मार्गदर्शन करणार आहेत. दहावी आणि बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर नेमके काय करावे असा प्रश्न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पडतो. आयुष्याचे हे निर्णायक वळण असते. त्यामुळे योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे ठरते. त्यासाठी सम्राट अशोक युवा ग्रुपच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिराची ही संधी उपलब्ध करून दिली आहे. ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांमध्ये मोठी गुणवत्ता असते. परंतु मार्गदर्शनाचा अभाव पाहता भविष्याच्या वाटांमध्ये अनेक अडथळे येतात. ते दूर करण्याचा प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून होणार आहे.
•पोलीस भरती मधील शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा मार्गदर्शन.
•दहावी बारावीनंतर उपलब्ध करिअर पर्याय (सरकारी व खाजगी)
•मोफत मार्गदर्शन
•प्रश्नोत्तर सत्र/चर्चा
या विषयांवर होणाऱ्या मार्गदर्शन शिबिराचा रायपूर व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सम्राट अशोक युवा ग्रुपने केले आहे.


