mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

समृद्धी महामार्गावर लक्झरी पेटली चालकाच्या सतर्कतेने बचावले ३५ प्रवासी : Luxury Bus Catches Fire on Samruddhi Expressway; 35 Passengers Saved Thanks to Driver’s Alertness.

शेअर करा :

Luxury Bus Catches Fire on Samruddhi Expressway; 35 Passengers Saved Thanks to Driver’s Alertness. : समृद्धी महामार्गावर लक्झरी पेटली; चालकाच्या सतर्कतेने बचावले ३५ प्रवासी 

Luxury Bus Catches Fire on Samruddhi Expressway; 35 Passengers Saved Thanks to Driver's Alertness.
समृद्धी महामार्गावर लक्झरी पेटली

मेहकर

भरधाव वेगातील लक्झरी बस अचानक पेटली. मात्र, मागील वाहनचालकाने आपले वाहन वेगाने चावलून तातडीने चालकास माहिती दिल्याने लक्झरीचालकाने गाडी तत्काळ थांबवली. यामुळे ३५ प्रवासी बालंबाल बचावले. नंतर संपूर्ण बस जळून खाक झाली. २ मे रोजी पावणेसहाच्या सुमारास नागपूर कॉरिडॉर चॅनेल क्रमांक २९५.७०० वर हा अपघात घडला.

आणखी बातम्या वाचण्यासाठी खाली लिंकला क्लिक करा https://mahadesha.com/

समृद्धी महामार्गाने मुंबईकडून पुसदकडे जाणारी खासगी लक्झरी बस (क्रमपांक एमएच-३८-एफ-३८९९) ने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे दिसताच मागील वाहनाच्या चालकाने माहिती दिली. त्यामुळे लक्झरी चालकाने बस थांबवून प्रवाशांना उतरविले. यामुळे ३५ प्रवाशांचा जीव वाचला. उतरण्याच्या घाईत बबन कदम (वय ४८, रा. पुसद) या प्रवाशाच्या खांद्याला मार लागला. प्रवासी खाली उतरल्याच्या काही क्षणातच संपूर्ण बसला आगीचा विळखा पडला. समृद्धी महामार्गावर लक्झरी बस पेटल्याची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग पोलीस व मेहकर पोलीस घटनास्थळी पोहोचले. महामार्गावरील वाहने सुरक्षितपणे बाजूला करण्यात आली. मार लागलेल्या प्रवाशाला मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले.

Luxury Bus Catches Fire on Samruddhi Expressway; 35 Passengers Saved Thanks to Driver's Alertness.
चालकाच्या सतर्कतेने बचावले ३५ प्रवासी

लोकांच्या भीतीने वाहनचालक आकाश जमदाडे (वय ३२, रा. पुसद, जि. यवतमाळ) हा घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी प्रवासी शुभम देशमुख (वय २५, रा. पुसद) यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ही ट्रॅव्हल्स पुणे येथून पुसदकडे जात होती. या बसने पाठीमागून पेट घेतल्याचे मागील वाहनचालकाने सांगितले, तेव्हाच चालकाने गाडी बाजूला घेतली.

समृद्धी महामार्गावर मागून येणाऱ्या वाहन प्रसंगावधान राखत वेळीच चालकाला माहिती दिल्याने मोठा अनर्थ टळला; अन्यथा मोठी दुर्घटना घडून पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर प्रवाशांचा कोळसा झाल्याचे दुर्दैवी चित्र दिसले असते. या अपघातातून बचावल्याने सर्वच प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top