mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

हत्या करून वडिलांचा मृतदेह लाकडांवर जाळला : Murdered and burned fathers body on fire

शेअर करा :

Murdered and burned fathers body on fire : अर्ध्या रात्री उठून दारू मागणाऱ्या बापाची २१ वर्षीय मुलाने गुप्तांगावर लाथ मारून हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी शेतातच पराड्याच्या पायथ्याशी असलेल्या लाकडांच्या ढिगाऱ्यावर मृतदेह टाकून पेटवून दिला.


Murdered and burned fathers body on fire
मृतदेह जाळलेल्या जागेचा पंचनामा करताना पोलीस
Murdered and burned fathers body on fire
पोलिसांनी अटक केलेला आरोपी

दारू मागणाऱ्या पित्याचा मुलाने खेळ केला खल्लास : दहाव्या दिवशी गुन्हा उघड : हतेडी खुर्द येथील घटनेने खळबळ 

बुलढाणा : अर्ध्या रात्री उठून दारू मागणाऱ्या बापाची २१ वर्षीय मुलाने गुप्तांगावर लाथ मारून हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी शेतातच पराड्याच्या पायथ्याशी असलेल्या लाकडांच्या ढिगाऱ्यावर मृतदेह टाकून पेटवून दिला. आपले बिंग फुटू नये म्हणून वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. मात्र, मुलाने वडिलांचे घडविलेले हत्याकांड फार काळ लपून राहिले नाही. पोलिसांनी केलेल्या तपासात मुलानेच पित्याला संपविल्याचे दहाव्या दिवशी समोर आले.

तालुक्यातील हतेडी खुर्द येथे सस्पेन्स सिनेमाप्रमाणे ही थरारक घटना घडली. समाधान पूंजाजी घायवट (वय ४४) असे मृत वडिलाचे नाव आहे. मुलगा अनिकेत समाधान घायवट (वय २१) याला बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी गुन्हे दाखल करून अटक केली आहे. घेवट घटनेच्या दिवशी समाधान घायवट यांची आई, पत्नी व मुलगा लग्नानिमित्त बाहेरगावी गेले होते. समाधान घायवट व मुलगा अनिकेत हे दोघेच घरी होते. त्याचदिवशी रात्री घायवट यांनी मित्रांसोबत दारू व मटण पार्टी केली. मित्र घरी गेल्यानंतर मध्यरात्री एकच्या सुमारास उठून समाधानने मुलास दारू आणून दे म्हणत वाद घातला. तसेच मारहाण केली. यामुळे संतापलेल्या अनिकेतने वडील समाधानच्या गुप्तांगावर जोराने लाथ मारली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मृत समाधान नेहमीच दारू पिऊन घरी वाद घालायचा. त्यामुळे कुटुंबीय त्याच्या दारूच्या व्यसनाला कंटाळले होते. पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन कांबळे, एपीआय शरद माळी, पोहेकॉ गजानन काकडे, महादेव इंगळे, गजानन राजपूत यांनी आरोपी मुलास अटक केली.

 

मोबाइल लोकेशन निघाले घरातच

घटनेनंतर काही घडलेच नाही, असा मुलगा वागू लागला. त्याने आपले वडील बेपत्ता झाल्याची तक्रार बुलढाणा ग्रामीण पोलिसांत दिली. आई व भावाला थोडीशी भनक लागू दिली नाही. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. पोहेकॉ गजानन काकडे यांनी वेगवेगळ्या दिशेने बेपत्ता समाधानचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मोबाइलचे लोकेशन मात्र घरातच दाखवित होते. अखेर संशय बळावल्यानंतर कसून चौकशी करण्यात आल्याने आरोपी मुलाने गुन्हा कबुल केला.

 

पोलिसांना विचारायचा तपासाबद्दल माहिती 

वडिलांची हत्या झाल्यामुळे आरोपी मुलगा क्राइम माइंडने वागू लागला. आपल्यावर संशय येऊ नये म्हणून तो तपास अधिकाऱ्यांना मोबाइलवर वडील सापडले काय? याबद्दल विचारणा करीत होता. पोलिस चौकशीला गेल्यानंतर तो घाबरलेला आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत होते. वडिलांच्या हत्येचा गुन्हा तो जास्त दिवस लपवू शकला नाही.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top