mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

अकोला एटीएसने पकडला पिस्तूल तस्कर : Akola ATS arrests pistol smuggler

शेअर करा :

Akola ATS arrests pistol smuggler : कुख्यात गुन्हेगार असलेल्या पिस्तूल तस्कराच्या अकोला येथील दहशतवाद विरोधी पथकाने बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंत्री वाघापूर येथे मुसक्या आवळल्या.


Akola ATS arrests pistol smuggler

 

अंत्री वाघापूर येथे आवळल्या मुसक्या : ९० काडतूसांसह दोन गावठी पिस्तूल जप्त 

सैलानी : कुख्यात गुन्हेगार असलेल्या पिस्तूल तस्कराच्या अकोला येथील दहशतवाद विरोधी पथकाने बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंत्री वाघापूर येथे मुसक्या आवळल्या. आरोपीच्या ताब्यातून दोन गावठी पिस्तूल व ९० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.  

अकोला एटीएसने बुलढाणा जिल्ह्यात केलेल्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. हा गुन्हेगार वर्धा जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे. चिखली तालुक्यात व रायपूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अंत्री (वाघापूर) येथे हा आरोपी नातेवाइकाच्या घरी आला होता. या आरोपीबद्दल माहिती मिळाल्यानंतर अकोला एटीएसचे पथक सजग झाले. आरोपीला शिताफीने पकडण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेची या कारवाईत मदत झाली. आरोपीकडून दोन गावठी पिस्तूल आणि ९० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणी रायपूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हे नोंदविण्याची कारवाई सुरू होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top