Murderous thrill in Khamgaon : खामगाव शहरातील बर्डे प्लॉट येथे २५ एप्रिल रोजी रात्री डीजेवर नाचताना लागलेल्या धक्क्यावरून उफाळलेल्या वादाचे पर्यवसान थेट खुनी थरारात झाले.

डीजेवर नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून युवकाचा खून
खामगाव : शहरातील बर्डे प्लॉट येथे २५ एप्रिल रोजी रात्री डीजेवर नाचताना लागलेल्या धक्क्यावरून उफाळलेल्या वादाचे पर्यवसान थेट खुनी थरारात झाले. यामध्ये चार ते पाच जणांनी एका २३ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्र आणि फायटरने हल्ला करून जागीच ठार केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे बर्डे प्लॉट भागामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शोएब खान अमीन खान (वय २३) रा. बर्डे प्लॉट खामगाव असे मृतक युवकाचे नाव आहे. बर्डे प्लॉट भागातील स्मशानभूमीच्या जवळ एका लग्न समारंभामध्ये डीजेवर नाचगाणे सुरू होते. युवक मंडळी नाचत होते. यामध्ये शोएब खान अमीन खान हा सुद्धा नाचत असताना त्याचा एका युवकाला धक्का लागला. या क्षुल्लक कारणावरून अचानक वाद उफाळून आल्याने परिसरातील चार ते पाच जणांनी शोएब खान याच्यासोबत वाद घातला. त्याच्यावर धारदार शस्त्र आणि लाठ्याकाठ्यांनी हल्ला करून त्याला ठार मारले. घटनास्थळी पोलिसांनी बंदोबस्त लावला असून गुन्हा दाखल केला आहे.


