mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

प्रेम जाळ्यात अडकवून सर्वस्व लुटले; होणारे लग्न मोडण्याचा प्रयत्न : Trapped in a love trap

शेअर करा :

Trapped in a love trap : आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर गोड बोलून प्रियकराने सर्वस्व लुटले. तिच्या सोबत फोटो आणि व्हिडिओ काढून व्हायरल करण्याच्या धमक्या देत सारखे ब्लॅकमेल केले आणि दीर्घकाळ अत्याचार केला.


Trapped in a love trap

फोटो, व्हिडिओ व्हायरलच्या धमक्या देत केले ब्लॅकमेल : कथित प्रियकरास अटक : खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव : आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर गोड बोलून प्रियकराने सर्वस्व लुटले. तिच्या सोबत फोटो आणि व्हिडिओ काढून व्हायरल करण्याच्या धमक्या देत सारखे ब्लॅकमेल केले आणि दीर्घकाळ अत्याचार केला. होणाऱ्या पतीबद्दल चुकीची माहिती सांगून तरुणीचे लग्नदेखील मोडण्याचा प्रयत्न केला. खामगाव तालुक्यातील एका गावात ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी धोकेबाज प्रियकरा अटक करण्यात आली आहे. 

आरोपी भीमराव रूपाजी इंगळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने २४ वर्षांच्या तरुणीचे जीवन उद्ध्वस्त केले. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ६४ (२) (एम), ३५१ (२), ३५६ (२) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. 

वारी हनुमान ते सलवान रामसेतूपर्यंत बनणार पादचारी पूलhttps://mahadesha.com/wari-hanuman-to-salwan-ram-setu-pedestrian-bridge/

जानेवारी २०२० ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत आरोपीने पीडित तरुणीला विश्वासात घेऊन गोडीगुलाबीने प्रेमसंबंधासाठी तयार केले. फेब्रुवारी २०२० मध्ये आरोपीने फिर्यादीला खामगाव येथे बोलावून मोटारसायकलने शेगाव येथे नेले. तेथे एका लॉजवर नेऊन ‘शारीरिक संबंध ठेव, अन्यथा मी स्वतःचे नुकसान करेन’, अशी धमकी देत जबरदस्तीने अत्याचार केला. या वेळी आरोपीने फिर्यादीचे फोटो व व्हिडिओ मोबाइलमध्ये काढले. त्यानंतर वारंवार जीवितहानीची धमकी देत तसेच फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती दाखवत आरोपीने शेगाव येथे नेऊन अनेकदा जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले.

दरम्यान, २० मार्च २०२६ रोजी तरुणीच्या साखरपुड्यापूर्वी आरोपीने तिच्या होणाऱ्या पतीबाबत चुकीची माहिती देत लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. तसेच ३ एप्रिल २०२६ रोजी पुन्हा एकदा ‘शेवटची भेट’ या कारणावरून बोलावून शेगाव येथे नेऊन अत्याचार केल्याचेही समोर आले आहे. 

 

भावी पतीच्या नातेवाइकांना बोलावून केली बदनामी

आरोपीने पीडितेच्या होणाऱ्या पतीच्या नातलगांना बोलावून तिच्याबाबत अपप्रचार केला व फोटो दाखवले. अखेर आपल्यावरील अत्याचाराविषयी तरुणीने खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षकांकडे सोपविण्यात आला आहे. 

 

आरोपीस रात्री उचलले

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी कसून शोध घेत आरोपी भीमराव इंगळे याला २५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता अटक केली. सध्या आरोपी पोलिस कोठडीत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top