Wari Hanuman to Salwan Ram Setu Pedestrian Bridge : वारी हनुमान ते सलवान रामसेतू केबल स्टेड एफओबी पादचारी पुलाच्या बांधकामासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी वन मंत्रालयाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले.

वन्यजीव विभागाची परवानगी : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांना यश
बुलढाणा : वारी हनुमान ते सलवान रामसेतू केबल स्टेड एफओबी पादचारी पुलाच्या बांधकामासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी वन मंत्रालयाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, वन्यजीव विभागाने या पादचारी पुलाच्या बांधकामास परवानगी दिली आहे.

संग्रामपूर तालुक्यातील वारी हनुमान ते सलवानदरम्यान पूल बांधण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांची होती. हे क्षेत्र हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पच्या बफर झोनमध्ये येते. त्यासाठी वन्यजीव विभागाची परवानगी आवश्यक होती. केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी या संदर्भात वन मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून वन्यजीव विभागाच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बफर झोनमधील वारी हनुमान येथे रामसेतू केबल स्टेड एएफओबी पादचारी पूल बांधण्यास परवानगी दिली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या पुलाची डिझाईन व निविदाही काढण्यात आली. सुमारे ७४६.४० लक्ष रुपयांचा हा पूल असणार आहे. पूलाची उंची ४५.८०० मीटर उंच एवढी राहील. केबल स्टेड एफओबीद्वारे तो जोडल्या जाणार आहे. या पुलामुळे वारी ते सलवान येथे जाणे, येणे पादचाऱ्यांना सोयीचे होणार आहे.


