Medical Council Election : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी उद्या २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

२६३५ मतदार बजावणार हक्क
बुलढाणा : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी उद्या २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. २ हजार ६३५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या लेक्चर हॉलमध्ये चार मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या ठिकाणी मतदान केंद्राध्यक्ष म्हणून अनंत पाटील, गोपाल कडू, हरी वीर व मुरली गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सुमारे २५ मतदान कर्मचारी कामकाज पाहणार आहेत.
वैद्यकीय अधिकारी तसेच नोंदणीकृत डॉक्टर असे जिल्ह्यात २ हजार ६३५ मतदार आहेत. प्रत्येक मतदाराला एकूण ९ मते देण्याचा अधिकार आहे.


