mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

बारा बोअर बंदुकीसह काडतुस जप्त : 12-Bore Gun and Cartridge Seized

शेअर करा :

12-Bore Gun and Cartridge Seized : बारा बोअर बंदुकीसह काडतुस जप्त

12-Bore Gun and Cartridge Seized


बुलढाणा : 

शेगाव ग्रामीण पोलिसांनी पकडलेल्या पाच दरोडेखोरांपैकी एकाने लपवून ठेवलेली बारा बोअर बंदूक व एक ७० एमएमचे जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले.

काही आरोपी दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती शेगाव ग्रामीण पोलिसांना समजली होती. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. या प्रकरणी गुन्हा नोंदवून कसून तपास सुरू करण्यात आला. पीसीआरमध्ये असताना आरोपी जमीन हुसेन ईनामुल्ला (रा. बऱ्हाणपूर) याने २१ एप्रिल रोजी घटनेच्या वेळी त्याच्याजवळ असलेली बारा बोअर बंदूक जानोरी येथे घटनास्थळी लपवून ठेवल्याचे पोलिसांना सांगितले. शुक्रवारी आरोपीला घटनास्थळी नेऊन पोलिसांनी बंदूक व एक ७० जिवंत काडतुस जप्त केले. तसेच २४ एप्रिल रोजी आरोपींनी बऱ्हाणपूर येथून शेगाव येथे येण्यासाठी व त्यामध्ये बंदूक आणण्यासाठी कारचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले. लाल रंगाची महिंद्रा कार (क्रमांक एमपी-६८-सी-४७८६) ही शेगावातील मिल्लतनगर येथून पीसीआरमधील आरोपी शरीफ अहमद शहीद अहमद (बऱ्हाणपूर) याच्याकडून जप्त करण्यात आली

आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/

पोलीस अधीक्षक नीलेश जांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील व पोलीस निरीक्षक पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण लिंगाडे, पोहेकॉ नंदकिशोर तिवारी, उमेश आखरे, मंगेश पाटकर यांनी ही कारवाई केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top