mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

नवविवाहितेची माहेरात आत्महत्या : Newlywed woman commits suicide at her parents’ home.

शेअर करा :

Newlywed woman commits suicide at her parents’ home. : नवविवाहितेची माहेरात आत्महत्या

Newlywed woman commits suicide at her parents' home.


सैलानी : लग्न होऊन अवघे पाच महिने होत नाही तोच संसार विखुरला. एका नवविवाहितेने माहेरात असताना आत्महत्या केली. तालुक्यातील घाटनांद्रा येथे २ जुलैच्या दुपारी ही घटना उघडकीस आली.

उज्ज्वला नितीन नरोटे (वय १९) असे मृत विवाहितेचे नाव आहे. बुलढाणा तालुक्यातील घाटनांद्रा हे माहेर असलेल्या उज्ज्वलाचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात येणाऱ्या वसई येथील नरोटे कुटुंबातील नितीनसोबत फेब्रुवारी महिन्यात लग्न झाले. सुखी, संसाराची स्वप्ने रंगवित असतानाच काय अप्रिय घडले की नवविवाहितेला मृत्यूला कवटाळावे लागले. तीन दिवसांपूर्वी उज्ज्वला माहेरी घाटनांद्रा येथे आली होती. २ जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास माहेरी वडिलांच्या घरात ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच आक्रोश झाला.

राजेंद्र बबन कन्नर यांनी रायपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनास्थळपंचनामा केला. तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आला. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार नीलेश सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ कैलास खार्डे व पोलीस शिपाई अझरूद्दीन काझी हे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top