mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

धाड ते जामठी-दहीद फाटा रस्ता तात्काळ दुरुस्त करा : Repair the Dhad to Jamthi-Dahid Phata road immediately.

शेअर करा :

Repair the Dhad to Jamthi-Dahid Phata road immediately. : धाड ते जामठी-दहीद फाटा रस्ता तात्काळ दुरुस्त करा; शिवसेना जिल्हाप्रमुखांचा आक्रमक इशारा

Repair the Dhad to Jamthi-Dahid Phata road immediately.


शिवसेना जिल्हाप्रमुखांचा आक्रमक इशारा

 

बुलढाणा प्रतिनिधी दि १८ : तालुक्यातील धाड ते जामठी या महत्त्वाच्या मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली असून, रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या मार्गावरून पुढे गिरडा मार्गे मलकापूरपर्यंत वाहतूक चालते. धाड ते जामठी दरम्यानच्या आठ ते दहा किलोमीटर अंतरातील खड्ड्यांमुळे अनेकदा जीवघेणे अपघात घडले असून जीवितहानीही झाली आहे. त्यामुळे हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा गंभीर इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिला आहे.

या गंभीर समस्येबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र काळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले.

धाड, जामठी आणि दहीद फाटा या मार्गावरील खराब रस्त्यामुळे सामान्य नागरिक, वाहनचालक तसेच शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने या रस्त्याची सुधारणा करून सुरळीत व सुखकर दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निर्धारित वेळेत रस्त्याचे काम न झाल्यास शिवसेना आक्रमक भूमिका घेईल आणि धाड येथे रास्ता रोको आंदोलन पुकारले जाईल, असा पुनरुच्चार जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केला.

या प्रसंगी शिवसेना जिल्हा समन्वयक गजानन धांडे, बुलढाणा तालुका प्रमुख विजय इतवारे तसेच किसान सेना उपजिल्हाप्रमुख गजानन उबरहंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top