mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

अन्न व औषध प्रशासनाच्या धास्तीने मलकापूर पांग्रा येथे दुकाने बंद : Shops in Malkapur Pangra closed due to fear of the Food and Drug Administration.

शेअर करा :

Shops in Malkapur Pangra closed due to fear of the Food and Drug Administration. : अन्न व औषध प्रशासनाच्या धास्तीने मलकापूर पांग्रा येथे दुकाने बंद

Shops in Malkapur Pangra closed due to fear of the Food and Drug Administration.


मलकापूर पांग्रा (अमोल साळवे): सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांगरा येथे अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) संभाव्य कारवाईच्या धास्तीने अनेक दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली. शेगाव येथील कारवाईचे पडसाद उमटल्याने, मलकापूर पांग्रा परिसरातील गावांमध्येही अफवांचे पेव फुटले आणि त्याचा परिणाम म्हणून दुपारपासून संध्याकाळपर्यंत अनेक दुकाने बंद राहिली.

या बंदमध्ये केवळ किरकोळ दुकानेच नव्हे, तर दैनंदिन गरजेच्या वस्तू विकणारी किराणा दुकाने, स्वीट मार्ट आणि दूध डेअरीसारखी अत्यावश्यक सेवा देणारी दुकानेही सामील होती. हॉटेल्सनीही या धास्तीपोटी आपले शटर खाली ओढले. अचानकपणे दुकाने बंद झाल्याने ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागला, विशेषतः दुपारनंतर आवश्यक वस्तू मिळवण्यासाठी त्यांना वणवण करावी लागली.

या प्रकारामागे शेगाव येथे अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईची चर्चा हे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. शेगाव येथील कारवाईमुळे अनेक गावांमध्ये “एफडीए” येणार असल्याची अफवा पसरली. या अफवांनी इतके जोर धरले की, मलकापूर पांग्रा येथील दुकानदारांनी कोणताही धोका न पत्करता आपली दुकाने बंद ठेवणे पसंत केले.

या सर्व घडामोडींमध्ये एका नावाची विशेष चर्चा होती, ती म्हणजे “तुकाराम मुंढे”. प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांच्या कठोर आणि नियमानुसार कारवाई करण्याच्या वृत्तीमुळे ते सर्वसामान्यांमध्ये परिचित आहेत. त्यांच्या नावाची धास्ती इतकी आहे की, केवळ त्यांच्या नावानेच अनेक ठिकाणी नियमांचे पालन केले जाते किंवा अशाप्रकारे दुकाने बंद ठेवली जातात. मलकापूर पांग्रा येथील ग्रामस्थांच्या तोंडीही “तुकाराम मुंढे” यांचेच नाव होते, जे त्यांच्या कार्यपद्धतीची भीती आणि आदर दोन्ही दर्शवते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top