mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

खामगावात दगडफेक; १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल : Stone pelting in Khamgaon

शेअर करा :

खामगावात दगडफेक; १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल : Stone pelting in Khamgaon

Stone pelting in Khamgaon

खामगाव : हॉर्न वाजविण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेला वाद अधिक भडकला. परिस्थिती चिघळत चालल्यानंतर दोन गटांत दगडफेक झाली. शहरातील निर्मल टर्निंग परिसरात गुरुवार, ७ मे रोजी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. शिवाजीनगर पोलिसांनी १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

मिळालेल्या माहितीनुसार, काही युवक सार्वजनिक रस्त्यावर क्रिकेट खेळत होते. त्याचवेळी जुनाफैल परिसरातील लखन ऊर्फ शशांक पडोळे हे मोटारसायकलने तेथून जात असताना त्यांनी हॉर्न वाजवला. यावरून क्रिकेट खेळणाऱ्या युवकांनी ‘हॉर्न का वाजवला?’ असा जाब विचारत वाद घातला. हा वाद वाढत जाऊन संबंधित युवकाला दगडाने मारहाण करण्यात आली. यात तो जखमी झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. घटनेची माहिती परिसरात पसरताच दोन गटांतील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. दोन्ही गटांमध्ये सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर परिस्थिती चिघळून दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला. तसेच परस्परांना शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे एपीआय सुनील बोरले यांच्या तक्रारीवरून गुन्हे नोंदविण्यात आले.  पोलिसांनी सय्यद वसीम ऊर्फ गब्बर सय्यद कासम, राजू खान, अप्पू ऊर्फ हाफीज पठाण, सोनू ऊर्फ शेख आफताब शेख रफिक, सुलतान खान, शेख इटी ऊर्फ ईटीदादा शेख अयुब, शेख नदीम ऊर्फ कालूभाई शेख अलीम, शेख वक्तु रहमोददीन, सोहेल शहा रफिक शहा, सय्यद मोहसीन सय्यद कासम, सुरज ससे, विश्वंभर मनाळ, गणेश वानखडे, नाना चिखले, अश्विन खंडागळे आणि दीपक करपे यांच्यासह इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १८९ (२), १८९ (३), १९१ (१), १९१ (२), १२५, ११८ (१), ३५१ (१) व ३५२ (२) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन सरकटे करीत आहेत.

आणखी बातम्या वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 👉https://mahadesha.com/

घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील,शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top