Tall container gets stuck under a bridge on the Samruddhi Mahamarg. : समृद्धी महामार्गावर पुलाखाली अडकला उंच कंटेनर

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ जास्त उंचीचा एक कंटेनर पुलाखाली अडकला. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली.
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचे असंख्य जड वाहनांची वाहतूक सुरू असते. बरीच वाहने पुलाच्या उंचीएवढी असल्याने ती अडकतात. असाच एक अधिक उंची असलेला कंटेनर मेहकरजवळ पुलात अडकून पडला.

या वाहनाची उंची पुलाच्या क्लिअरन्सपेक्षा जास्त होती. टायरमधील हवा सोडून मोठ्या प्रयत्नानंतर कंटेनर पुलाखालून बाहेर काढण्यात आला.
या वाहनाची माहिती मिळाल्यानंतर फर्दापूर महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन करून इतर वाहनांची सुरक्षितपणे वाहतूक सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला..मात्र, काही काळ विस्कळीत झालेल्या वाहतुकीमुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.


