Jijau Smrutijyot Rath Yatra sets off from birthplace to Samadhi site. : जन्मस्थळ ते समाधीस्थळ जिजाऊ स्मृतिज्योत रथयात्रा रवाना

बुलढाणा : राष्ट्रमाता मॉं जिजाऊ यांच्या ३५३ व्या पुण्यतिथीनिमित्त जन्मस्थळ सिंदखेड राजा ते समाधीस्थळ पाचाड (किल्ले रायगड) जिजाऊ स्मृतिज्योत रथयात्रा रविवारी मातृतीर्थ येथून मार्गस्थ झाली.
राजे लखुजीराव जाधवराव यांच्या वंशजांच्या वतीने आणि समस्त जिजाऊ व शिवभक्तांच्या वतीने यंदाही ‘रथयात्रा, जिजाऊंच्या विचारांची स्मृती ज्योत व जलपूजन सोहळा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ५ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता सिंदखेड राजातील लखुजी राजेजाधवांच्या राजवाड्यात जिजाऊ जन्मस्थळ जन्मस्थळी मान्यवरांच्या उपस्थितीत रथयात्रेचा प्रस्थान सोहळा झाला.

सिंदखेडराजा येथील पाच विहिरींच्या जलाने मॉं जिजाऊ यांच्या समाधीला जलाभिषेक करण्यात येणार आहे. यावेळी आमदार मनोज कायंदे, माजी आमदार शशिकांत खेडेकर, माजी आमदार तोताराम कायंदे, नगराध्यक्ष सौरभ तायडे, न.प. उपाध्यक्ष दीपाली म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, माजी नगराध्यक्ष विष्णू मेहेत्रे, शिवप्रसाद ठाकरे, शिवसेना महिला आघाडीच्या भाग्यश्री खेडेकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील कायंदे, सिध्दार्थ जाधव तालुका अध्यक्ष रा.कॉ. सिं. राजा, आत्माराम शेळके ता. प्रमुख शिवसेना उ.बा. ठा.सिं.राजा, कृष्णा माणिक मेहेत्रे नगरसेवक, देविदास ठाकरे माजी नगराध्यक्ष, वैभव देशमुख शिवसेना ता.प्रमुख, सिं.राजा, नगरसेवक आवेज खाननजिम खान, संगीता किशोर म्हरके नगरसेविका, गौतम प्रकाश खरात नगरसेवक, शिवसेना नेते गजेंद्र देशमुख, राजेंद्र आढाव उप अध्यक्ष संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र, आनंद देशमुख तालुकाध्यक्ष भाजप, नगरसेवक सिंधु जगन ठाकरे नगरसेविका कैलास नागोराव म्हस्के,
बालाजी मेहेत्रे, कैलास नारायण मेहेत्रे, हभप विश्वनाथ महाराज उगले, नगरसेविक संदीप सखाराम मेहेत्रे, वैभव मेहेत्रे, तालुका अध्यक्ष देऊळगावराजा राष्ट्रवादी अजित पवार सदाशिव मुंढे, नितीन कायंदे, गजानन काकड सरपंच, शुभम कायंदे, अमोल भट जिल्हा प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, प्रतापआण्णा राजे, प्रा. गोपाल राजे, आनंद राजे, मार्तंड राजे, संजय राजे, अर्जुन राजे, अभिजित राजे, मनोज राजे, प्रभाकर राजे, शिवाजी पुरंदरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार मनोज कायंदे यांनी गत चार वर्षांपासून चालत आलेल्या रथयात्रेचे कौतुक करून पुढील प्रवासास शुभेच्छा दिल्या. माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी रथयात्रेचे नियोजन ही सोपी बाब नसून रथ यात्रेच्या माध्यमातून सामाजिक ऐक्यतेचा संदेश महाराष्ट्रात सकारात्मक पद्धतीने जात असल्याचे नमूद करून संयोजकांना शुभेच्छा दिल्या. माजी आमदार तोताराम कायंदे यांनी परिसरातील राजेजाधव मंडळीच्या वतीने काढण्यात येत असलेली रथयात्रा जिजाऊंच्या विचाराला महाराष्ट्रात पोहोचविणारे माध्यम असल्याचे सांगितले.
स्मृतिज्योत महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक आणि प्रमुख शहरांमधून प्रवास करत जिजाऊ समाधी स्थळ पाचड (किल्ले रायगड) येथे पोहोचेल.
असा राहील यात्रेचा मार्ग
जालना, अंबड, अंतरवाली सराटी, शहागड, गेवराई, बीड, मांजरसुंबा पाटोदा, जामखेड कर्जत राशीन, भिवगाव बारामती, फलटण, कळंब लोणंदखंडाळा, भुईंज पाचवड, कुडाळ मेढा, महाबळेश्वर, प्रतापगड, पोलादपूर, महाड, पाचड (किल्ले रायगड) या मार्गाने रथ यात्रा जाणार असल्याचे रथयात्रेचे संयोजक भागवतराव राजेजाधव व राजे लखुजीराव जाधवराव यांच्या वंशजांनी सांगितले.


