Death claimed Ramesh Uberhande before he could even report for duty; he died after being struck by a Bolero. : ड्युटीवर जाण्यापूर्वीच रमेश उबरहंडेंना काळाने गाठले
बोलेरोच्या धडकेने मृत्यू: बुलढाणा शहरातील दुर्दैवी घटना
बुलढाणा : कर्तव्यावर जाण्यासाठी निघालेले बसचालक रमेश उबरहंडे यांच्यावर काळाने मध्येच क्रूर झडप घातली. भरधाव वेगातील बोलेरोच्या धडकेने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकानजीक हिरोळे पेट्रोलपंपाजवळ ३ जुलै रोजी सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात घडला.
मूळचे पांग्री उबरहंडे येथील रहिवासी असलेले रमेश सर्जेराव उबरहंडे (वय ५६) हे बुलढाणा आगारात चालक म्हणून कार्यरत होते. सद्यस्थितीत ते सागवन परिसरातील धाड नाक्याजवळ वास्तव्यास होते. ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान एमएच-२८-बीडी-२३३४ क्रमांकाच्या स्कुटीने ते कर्तव्यावर हजर होण्यासाठी बुलढाणा आगाराकडे निघाले होते. जयस्तंभ चौकापासून जवळच हिरोळे पेट्रोल पंपाजवळ एमएच-२८-बीबी-३४३० क्रमांकाच्या बोलेरो गाडीचा चालक अनिल बाळू बरडे (जुना गाव, भीलवाडा) याने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात बोलेरोच्या चाकाखाली आल्याने रमेश उबरहंडे गंभीर जखमी झाले. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

बुलढाणा ते मेहकर बसवर चालक म्हणून त्यांची आज ड्युटी होती. त्यासाठी ते घरून निघाले होते. मात्र, मध्येच काळ आडवा आला. बुलढाणा शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मुलगा अनिकेत रमेश उबरहंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी बोलेरो चालक अनिल बरडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास प्रभारी ठाणेदार गजानन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रणजित हिवाळे हे करीत आहेत.
एसटी कर्मचारी हळहळले
रमेश उबरहंडे यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करून सायंकाळी शोकाकुल वातावरणात शहरातील त्रिशरण चौकातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रमेश उबरहंडे यांच्या दुर्दैवी मृत्युमुळे बुलढाणा आगारातील चालक-वाहक व अधिकारी-कर्मचाऱ्यांसह पांगरी ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला. मृत उबरहंडे यांच्या मागे पत्नी, आई, एक मुलगा, मुलगी, जावई असा बराच आप्त परिवार आहे.