Women honored on International Womens Day : जागतिक महिला दिनानिमित्त पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात महिलांचा सत्कार करण्यात आला.

पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात आयोजन
बुलढाणा : जागतिक महिला दिनानिमित्त पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध कार्यक्रम पार पडले.
ठाणेदार भागवत मुळीक यांच्या वतीने महिला पोलीस पाटील, महिला दक्षता समितीच्या सदस्या, पोलीस स्टेशनमधील महिला अंमलदार तसेच महिला होमगार्ड यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आला.
महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या समाजातील योगदानाचा गौरव करत त्यांच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली.
यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.


