mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

रिसोड–मेहकर मार्गावर पॉवर हाऊस परिसरात आग; झाडे-झुडपे जळून खाक : Fire breaks out in power house area on Risod-Mehkar road; Trees and bushes burnt down

शेअर करा :

Fire breaks out in power house area on Risod-Mehkar road; Trees and bushes burnt down : रिसोड–मेहकर मार्गावरील पॉवर हाऊस परिसरात गुरुवार, ५ मार्च रोजी दुपारी तीन वाजता आग लागून झाडे व झुडपे जळून खाक झाली.

Fire breaks out in power house area on Risod-Mehkar road
Fire breaks out in power house area on Risod-Mehkar road

मोठा अनर्थ टळला
रिसोड : रिसोड–मेहकर मार्गावरील पॉवर हाऊस परिसरात गुरुवार, ५ मार्च रोजी दुपारी तीन वाजता आग लागून झाडे व झुडपे जळून खाक झाली. या घटनेत जीवितहानी झाली नाही.

आग लागल्याचे समजताच नगर परिषदेचा अग्निबंब तत्काळ पोहचला. कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. यादरम्यान नागरिकांनीही मदतकार्य केले. आगीचे लोळ तीस ते चाळीस फूट उंच उठले होते. आगीची तीव्रता वाढल्यामुळे पॉवर हाऊस परिसरातील सर्वच झाडेझुडपे व गवत जळून खाक झाले. आगीमुळे महात्मा फुलेनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीचे कारण समजू शकले नाही. 

शेतकऱ्यांनी आग आपल्या शेतापर्यंत येऊ नये, यासाठी उपाययोजना सुद्धा सुरू केल्या होत्या. पॉवर हाऊसच्या वॉल कंपाऊंडच्या बाहेर आग पसरली नसल्याने अनर्थ टळला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top