Alumni initiative for the progress of the Zilla Parishad school : माजी विद्यार्थी सोहम वायाळ यांच्या विशेष प्रयत्नातून आरेगाव व मादणी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत रोबोटिक्स व ड्रोन कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी ५ मार्च रोजी रोबोटिक्स व ड्रोन कार्यशाळा घेण्यात आली.






आजी विद्यार्थ्यांच्या साठी रोबोटिक कार्यशाळा
मेहकर : महाराष्ट्र राज्य कामगार विमा योजनेचे संचालक, उपजिल्हाधिकारी तथा आरेगाव जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी सोहम वायाळ यांच्या विशेष प्रयत्नातून आरेगाव व मादणी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत रोबोटिक्स व ड्रोन कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी ५ मार्च रोजी रोबोटिक्स व ड्रोन कार्यशाळा घेण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर येथील रोबोनिस्ट टेक सोल्यूशन यांच्या माध्यमातून घेण्यात आली. सदर कार्यशाळा ग्रामीण भागातील व माझ्या सारख्या खेड्यातून आलेल्या गावात म्हणजे आरेगाव व मादणी येथे घ्यावी म्हणून सोहम वायाळ यांनी प्रयत्न केले. तर या कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शकांनी रोबोटिक्स व ड्रोन तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती देत विविध प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी उडणारे ड्रोन तसेच सेन्सरवर सुरू होणारे दिवे व इतर साहित्य याबाबत विद्यार्थ्यांसमोर समोर प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेत रोबोट्स प्रत्यक्ष हाताळून पाहिले व त्यांची कार्यपद्धती समजून घेतली. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाची ओळख करून देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण होऊन नवोपक्रमशीलतेला चालना मिळाली. याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक संजय जुमडे व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी घेतलेला हा पुढाकार सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. तर मादणी येथे ही मुख्याध्यापक व सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी यांना मार्गदर्शन करुन प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.


