mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

महिलादिनानिमित्त प्रगती वाचनालयात अकरा कर्तृत्ववान महिलांचा गौरव : Eleven accomplished women honored at Pragati Library on Womens Day

शेअर करा :

Eleven accomplished women honored at Pragati Library on Womens Day : महिलांच्या जीवन संघर्षाचा सन्मान ८ मार्चला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.

Eleven accomplished women honored at Pragati Library on Womens Day

‘सन्मान महिलांच्या जीवन संघर्षाचा!’ कार्यक्रमाचे आयोजन

बुलढाणा : सामाजिक जाणीव ठेऊन सेंटर ऑफ इंडियन ट्रेंड युनियन आणि बुलढाणा येथील प्रगती वाचनालय यांच्या वतीने शासनाच्या विविध योजनेत काम करणाऱ्या तसेच समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरेला छेद देऊन अत्यंत बिकट आणि हलाखीच्या परिस्थितीत ज्यांनी आपली आगळीवेगळी ओळख समाजात निर्माण केली, अशा निवडक ११ महिलांच्या जीवन संघर्षाचा सन्मान ८ मार्चला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.
महिलांना मतांचा अधिकार मिळावा, समान कामाला समान वेतन, अमर्यादित असलेले कामाचे तास  कमी करून आठ तास मर्यादा करणे, रात्रपाळीच्या ड्युटीवर निर्बंध घालणे, आठवड्यातून एक साप्ताहिक सुट्टी, भरपगारी प्रसुती रजा मिळावी यासह विविध मागण्यांसाठी जगभरातील महिलांनी रस्त्यावर उतरून संघर्ष केला. एकत्र येऊन वेगवेगळ्या देशांत परिषदा घेतल्या. त्याचा परिणाम म्हणून हळूहळू मागण्या जागतिक स्तरावर मान्य कराव्या लागल्या. अखेर संयुक्त राष्ट्र महासंघाला ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करावी लागली. हा संघर्षाचा विजय आहे. आजही महिलांचा संघर्ष संपलेला नाही. अनेकदा शासकीय कार्यक्रमात पुरस्काराच्या नावाखाली बक्षीस वितरण केल्या जाते. आपण किती टक्के योजनेचे काम पूर्ण केले, यावरून आपले मूल्यमापन करून आपला सत्कार केला जातो. महिला कुठल्या परिस्थितीत काम करतात?, कामाचे ठिकाण किती सुरक्षित आहे. कामाच्या ठिकाणी महिलांना किती अडचणी येतात, महिलांची सामाजिक, आर्थिक परिस्थिती कशी आहे, याचे सरकारला  काही देणे घेणे नसते. त्यांना फक्त काम महत्त्वाचे असते. त्यामुळे शंभरातून एखाद्याचाच त्या बक्षीसासाठी नंबर लागतो. इतरांना पुढील वर्षीची वाट बघावी लागते. या महिला आपला नंबर लागावा म्हणून एवढे काम करतात की, आपले कुटुंब व स्वतःकडे सुद्धा लक्ष देण्यास त्यांना वेळ नसतो.
याच्या उलट CITU ही आपली संघटना विचार करते की, कामगार कर्मचाऱ्यांना कामाला पूरक अनुकूल परिस्थिती उपलब्ध करून दिली आणि कर्मचाऱ्यांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थिचा विचार केला तर सामान्यातल्या सामान्य व्यक्तीसुद्धा  अतिउच्च काम करू शकतात. हीच सामाजिक जाणीव ठेवून सेंटर ऑफ इंडियन ट्रेंड युनियन आणि बुलढाणा येथील प्रगती वाचनालय यांच्या वतीने शासनाच्या विविध योजनेत काम करणाऱ्या तसेच समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरेला छेद देऊन अत्यंत बिकट आणि हलाखीच्या परिस्थितीत ज्यांनी आपली आगळीवेगळी ओळख समाजात निर्माण केली. अशा निवडक ११ महिलांच्या जीवन संघर्षाचा सन्मान ८ मार्चला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निसर्गप्रेमी  शीलाताई किरण पाटील या उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हा कारागृह अधीक्षक मेधाताई बाहेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर प्रगती वाचनालयाचे सचिव प्रा.डॉ. कि.वा. वाघ व सीटूचे राज्य सचिव तथा जिल्हा अध्यक्ष पंजाबराव गायकवाड हे उपस्थित राहणार आहेत.

या सन्मान सोहळ्यास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रगती वाचनालय व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन सीटू संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top