mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

मासरूळ पंचायत समिती निवडणुकीत निष्ठावान शिवसैनिकाला न्याय मिळणार का? : Will a loyal Shiv Sainik get justice in the Masrul Panchayat Samiti elections?

शेअर करा :

Will a loyal Shiv Sainik get justice in the Masrul Panchayat Samiti elections? : मासरूळ पंचायत समिती निवडणुकीत निष्ठावान शिवसैनिकाला न्याय मिळणार का?

Will a loyal Shiv Sainik get justice in the Masrul Panchayat Samiti elections?

बुलढाणा : मासरूळ पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिसरात राजकीय हालचालींना वेग आला असून निष्ठावान शिवसैनिकाला न्याय मिळेल का याबाबत जोरदार चर्चा रंगू लागली आहे. विशेषतः युवासेनेचे उपतालुकाप्रमुख संदीप पालकर यांनी त्यांच्या पत्नी महिला आघाडीच्या उपतालुकाप्रमुख मनीषा संदीप पालकर यांच्या उमेदवारीसाठी जोरदार पाठपुरावा सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

संदीप पालकर हे अनेक वर्षांपासून शिवसेनेशी निष्ठावान राहून पक्षासाठी सक्रियपणे काम करत आहेत. विविध सामाजिक उपक्रम, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि स्थानिक पातळीवर असलेली त्यांची पकड यामुळे त्यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नी मनीषा पालकर यांना मासरूळ पंचायत समितीसाठी उमेदवारी मिळावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडूनही केली जात आहे.

दरम्यान, संदीप पालकर यांचे केंद्रीय मंत्री खासदार प्रतापराव जाधव व धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्याशी असलेले चांगले संबंध लक्षात घेता त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक पातळीवरही पालकर कुटुंबाचा प्रभाव असल्याने ही निवडणूक अधिकच चर्चेचा विषय ठरत आहे.

आता पक्षश्रेष्ठी या सर्व बाबींचा विचार करून निष्ठावान कार्यकर्त्याला संधी देणार का, की इतर कोणत्या नव्या चेहऱ्याला उमेदवारी देणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. मासरूळ पंचायत समितीच्या या संभाव्य उमेदवारीवरून आगामी काळात राजकीय समीकरणे कशी बदलतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top