mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

बालपणाच्या अंधारातून यशाच्या उजेडापर्यंत : From the darkness of childhood to the light of success

शेअर करा :

From the darkness of childhood to the light of success : बालपणाच्या अंधारातून यशाच्या उजेडापर्यंत.

From the darkness of childhood to the light of success
बुलढाणा : ग्रामीण महाराष्ट्रातील एका साध्या कुटुंबातील मुलगा आदित्य याने आपल्या अथक मेहनतीने आणि कुटुंबाच्या त्यागाने CISF (Central Industrial Security Force) मध्ये Constable पद मिळवले आहे. हे यश फक्त त्याचे वैयक्तिक नाही, तर आई-वडिलांच्या असीम त्याग, कुटुंबीयांच्या प्रेम आणि ग्रामीण भागातील मुलांच्या अटल इच्छाशक्तीचे प्रतीक आहे.
आदित्य यांचे शिक्षण माळवंडी गावातील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत झाले. पाचवी ते दहावी बुलढाणा येथील शिवाजी विद्यालयात, अकरावी-बारावी दुधा येथील जिजामाता महाविद्यालयात आणि पदवी अण्णासाहेब देशमुख महाविद्यालयात पूर्ण केली. कुटुंबात फक्त आई, वडील, ताई (बहिण) आणि आजी असे चार सदस्य. पाच एकर शेती असली तरी शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते. वडिलांचे स्वप्न होते की स्वतः शिक्षक व्हावे, पण परिस्थितीमुळे ते पूर्ण झाले नाही. म्हणूनच त्यांनी दोन्ही मुलांना शिक्षण देऊन  नोकरी मिळवण्याचे ठरवले.
आई-वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट केले. आदित्य आणि ताई पाच वर्षे बुलढाण्यात रूम घेऊन राहिले, तर वडील गावात राहिले. पैशाची अडचण कधीच मुलांपर्यंत पोहोचू दिली नाही. ताईने MSc Chemistry + BEd पूर्ण करून शिक्षिका म्हणून नोकरी मिळवली. मुलांच्या शिक्षणासाठी आई-वडिलांनी शेतीचा काही भाग विकला, दागिने बँकेत गहाण ठेवले. आईला स्वतः चांगले दागिने घालावेत असे कधी वाटले नाही – फक्त मुलांच्या भविष्यासाठी सर्व काही केले.
अपयशानंतरही हार न मानता मेहनत – आदित्य 
२०२२ पासून SSC GD Constable च्या तयारीला सुरुवात केली. अनेकदा अपयश आले, खचून गेला, पण डोळ्यासमोर आई-वडिलांनी विकलेली शेती आणि त्यांचे स्वप्न दिसत होते. “यश-अपयश दोन्ही येतात, पण अपयशानंतरही मेहनत करायला हवी” हे घरचे वातावरण आणि आई-वडिलांचा अटूट विश्वास यामुळे जिद्द टिकून राहिली.
अखेर मेहनतीचे फळ मिळाले – SSC GD मधून CISF मध्ये Constable पदाची निवड झाली. हे यश आदित्य यांच्या अथक परिश्रमाचे आहे, पण त्याचबरोबर आई-वडिलांच्या त्यागाचे आणि ग्रामीण भागातील मुलांच्या दृढ निश्चयाचे आहे.
शेतीतून काही पिकत नसले तरी मुलांच्या शिक्षणातून आणि मेहनतीतून यश पिकवले गेले. आदित्य यांची ही कहाणी ग्रामीण भागातील असंख्य युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top