mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

मलकापूर-छत्रपती संभाजी नगर मार्गावर राजुर घाटात भीषण अपघात टळला : A serious accident was averted at Rajur Ghat on the city road.

शेअर करा :

A serious accident was averted at Rajur Ghat on the city road : मलकापूर-छत्रपती संभाजी नगर मार्गावर राजुर घाटात भीषण अपघात टळला

A serious accident was averted at Rajur Ghat on the city road

बुलढाणा : थोड्याच वेळापूर्वी राजुर घाटात एक धक्कादायक अपघाताची घटना घडली. मलकापूर येथून छत्रपती संभाजी नगरकडे निघालेली बस क्रमांक MH 20 BL 3191 राजुर घाटात बिघाड झाल्यामुळे थांबली. त्याचवेळी मागून येणारा खताने भरलेला ट्रक क्रमांक MH 19 Z 4913 बसला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना वाचवण्याचा प्रयत्न करताना अचानक पलटी झाला.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बस आणि ट्रकमधील चालक व प्रवासी सुरक्षित आहेत. दुचाकीस्वारही वाचले आहेत. अशा घाटरस्त्यांवर वाहनचालकांनी विशेष काळजी घ्यावी, ब्रेक व टायर तपासावेत आणि ओव्हरस्पीड टाळावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top