mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

समय शिक्षा अभियानचे कर्मचारी ९ मार्चपासून सामूहिक रजेवर : Samay Shiksha Abhiyan employees on collective leave from March 9

शेअर करा :

Samay Shiksha Abhiyan employees on collective leave from March 9 : राज्यातील समय शिक्षा अभियान अंतर्गत BRC/URC स्तरावर कार्यरत केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सेवेत कायम करण्याच्या प्रमुख मागणीसाठी ९ मार्चपासून सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Samay Shiksha Abhiyan employees on collective leave from March 9

सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी मुंबई येथे आंदोलन : सहभागी होण्याचे सुभाष झिने यांचे आवाहन

बुलढाणा : राज्यातील समय शिक्षा अभियान अंतर्गत BRC/URC स्तरावर कार्यरत केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सेवेत कायम करण्याच्या प्रमुख मागणीसाठी ९ मार्चपासून सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई येथे होणाऱ्या अधिवेशन व आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन मोताळा साधन व्यक्ती सुभाष झिने यांनी केले आहे.

समितीच्या वतीने निता देशमुख (अमरावती विभाग ) यांच्या सह अनेक कर्मचाऱ्यांनी शासन व प्रशासन निवेदन सादर केले आहे.
समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या वतीने आझाद मैदान येथे ९ मार्चपासून आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनात कामबंद, आमरण उपोषण, अन्नत्याग तसेच इतर स्वरूपातील आंदोलनाचा समावेश असणार आहे. राज्यातील समग्र शिक्षातील कर्मचारी मागील १८ ते २० वर्षांपासून अल्प मानधनावर कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांच्या कायम सेवांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. कर्मचाऱ्यांनी यापूर्वी शासनाकडे वारंवार अर्ज, निवेदने व आंदोलने विनंती सादर केल्या आहेत. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास समितीचा अहवालही शासनाकडे सादर होऊन आठ महिने उलटले आहेत. तरीदेखील कायम सेवाबाबतचा शासन निर्णय प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वावर व मानवतेच्या दृष्टीकोनातून आमच्यावर होत असलेला अन्याय दूर करून आम्हालाही सेवेत कायम करावे, अशी मागणी करीत संबंधित कर्मचाऱ्यांनी ९ मार्च २०२६ पासून बेमुदत अर्जित रजेवर जाणार असल्याचे निवेदन दिले. तसेच संपूर्ण विदर्भात निवेदन दिली जात आहेत.

या आगोदर निम -शिक्षक विशेष शिक्षक यांना शासनाने कायम केले. परंतु इतर कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे.
त्यामुळे संघर्ष समितीने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top