mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

व्यापाराने नव्हे, तर आग्या मोहोळाने दुकानदार त्रस्त : Shopkeepers are suffering not from business but from the atmosphere of fire

शेअर करा :

Shopkeepers are suffering not from business but from the atmosphere of fire : मेहकरमधील कित्येक व्यावसायिक आग्या मोहोळाच्या मधमाशांनी त्रस्त आहेत. मधमाशा चावत असल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

Shopkeepers are suffering not from business but from the atmosphere of fire

मेहकरमधील घटना
मेहकर : एकीकडे व्यवसायात मंदी सुरू आहे. या मंदीने व्यावसायिक त्रस्त आहेत, तर दुसरीकडे मेहकरमधील कित्येक व्यावसायिक आग्या मोहोळाच्या मधमाशांनी त्रस्त आहेत. मधमाशा चावत असल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

Shopkeepers are suffering not from business but from the atmosphere of fire

आधीच शेतशिवारांत आग्या मोहोळाच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. आता शहरातही मधमाशांचा कहर झाला आहे. मेहकर येथे लाहोटी कॉम्प्लेक्ससह इतर काही ठिकाणी दरवर्षी मार्च ते मे महिन्यापर्यंत हे आगे मोहोळ बसतात. नंतर ते शांततेने निघून जातात. मात्र यावर्षी हे आगी मोहोळाच्या मधमाशा दुकानदार व ग्राहकांना चावत असल्याचे दिसून येते. तर दुकानात शिरकाव केल्याने दुकानदार व ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. आग्या मोहोळाचे करावे तरी काय? असा प्रश्न दुकानदारांमध्ये निर्माण झाला आहे. यासाठी कोणत्या विभागाची यंत्रणा काम करेल, या आगे मोहोळपासून सुटका कशी होईल, या विवंचनेत व्यावसायिक आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top