mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

बुलढाणा जिल्ह्यातील २७८६ दिव्यांग बांधवांना लवकरच मिळणार साहित्य : 2786 disabled brothers in Buldhana district will soon get literature

शेअर करा :

2786 disabled brothers in Buldhana district will soon get literature  : बुलढाणा जिल्ह्यातील २७८६ दिव्यांग बांधवांना लवकरच मिळणार साहित्य.

2786 disabled brothers in Buldhana district will soon receive materials. बुलडाणा : केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून आयुष मंत्रालयाच्या वतीने संतनगरी शेगाव येथे नुकताच भव्य राष्ट्रीय आरोग्य मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी या पारंपरिक उपचार पद्धतींसोबत आधुनिक तपासणी सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होत्या. विशेष म्हणजे २७ फेब्रुवारी रोजी दिव्यांग बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी व साहित्य नोंदणी शिबिरात जिल्ह्याभरातील २७८६ दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव एकत्र येणे हे केवळ आकडेवारी नाही, तर आशेचा महोत्सव ठरले. प्रत्येक दिव्यांग बांधवाच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, त्यांच्या आशा-आकांक्षा आणि भविष्यातील स्वावलंबी जीवनाची स्वप्ने पाहून उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी भारावून गेले.
काय मिळणार दिव्यांग बांधवांना
राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला जवळपास १०,००० रुपयांपर्यंतचे अत्याधुनिक साहित्य वितरित करण्यात येणार आहे. यात समाविष्ट आहे कर्णयंत्र Hearing Aid, चालण्याची काठी,कंबरपट्टा,व पायाचा पट्टासामान्य व्हीलचेअर, इलेक्ट्रिक व्हीलचेअर,कृत्रिम अवयव Artificial Limbs याशिवाय खासदार निधीतूनही काही दिव्यांग बांधवांना अतिरिक्त साहित्य वितरित करण्यात येणार आहे. सध्या कृत्रिम अवयव तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, सर्व साहित्य उपलब्ध झाल्यानंतर विशेष वाटप शिबीर घेण्यात येणार आहे. शिबिराची तारीख जाहीर झाल्यानंतर सर्व नोंदणीकृत दिव्यांग बांधवांना एसएमएस, फोन व ग्रामपंचायत स्तरावरून कळवण्यात येणार आहे.

प्रतापराव जाधव यांचे आवाहन
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, “दिव्यांग बांधव हे समाजाचे अविभाज्य अंग आहेत. त्यांना केवळ साहित्य देणे नव्हे, तर स्वावलंबी बनवणे हे आमचे ध्येय आहे. शेगाव मेळाव्यात २७८६ बांधवांनी नोंदणी केल्याने आम्हाला प्रचंड ऊर्जा मिळाली आहे. लवकरच हे सर्व साहित्य वितरित करून आम्ही त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू.”दिव्यांग बांधवांसाठी हा मेळावा का ठरला ‘गेम चेंजर’या शिबिरात केवळ नोंदणीच झाली नाही, तर आयुष मंत्रालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रत्येक दिव्यांग बांधवाची सविस्तर आरोग्य तपासणी केली. अनेकांना प्रथमच अशा मोफत आणि दर्जेदार सुविधा मिळाल्याने त्यांचा विश्वास वाढला. शेगावच्या पावन भूमीवर झालेल्या या उपक्रमाने जिल्ह्यातील दिव्यांग समाजात नवी आशा निर्माण केली आहे

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top