mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

संदीप दादा शेळके यांच्या वाढदिसानिमित्त गरजूंना कपडे वाटप : Distribution of clothes to the needy on the occasion of Sandeep Dada Shelke’s birthday.

शेअर करा :

Distribution of clothes to the needy on the occasion of Sandeep Dada Shelke’s birthday : संदीप दादा शेळके यांच्या वाढदिसानिमित्त गरजूंना कपडे वाटप.

Distribution of clothes to the needy on the occasion of Sandeep Dada Shelke's birthday सैलानी येथे कपडे वाटप करताना जिजाऊ ज्ञान मंदिर चे शिक्षक वृंद 

पळसखेड भट (बुलडाणा) – दि. १३ मार्च २०२६

राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष व वन बुलढाणा मिशनचे संस्थापक माननीय संदीप दादा शेळके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पळसखेड भट येथील कर्मचाऱ्यांनी एक अनोखा आणि हृदयस्पर्शी सामाजिक उपक्रम राबवला. सैलानी येथील राहुट्यांवर व झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या गरजू महिलांना साड्या, शॉल व नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमामुळे गरजूंच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटली आणि दादांचा वाढदिवस खरोखरच ‘आठवणीत राहणारा’ ठरला.

Distribution of clothes to the needy on the occasion of Sandeep Dada Shelke's birthday.

जिजाऊ ज्ञान मंदिर परिवार दरवर्षी संस्था अध्यक्ष संदीप दादा शेळके यांचा वाढदिवस वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांतून साजरा करतो. यावर्षीही कर्मचाऱ्यांनी ‘सेवा हीच पूजा’ या भावनेने सैलानी गावात जाऊन थेट गरजूंच्या दारात पोहोचले. साड्या, शॉल, मुलांसाठी कपडे असे उपयोगी साहित्य वाटप करताना प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले. एका गरजू महिलेने सांगितले, “दादांचा वाढदिवस आणि आम्हाला नवीन कपडे मिळाले, हे आमचे भाग्यच” अशा शब्दांत त्यांनी दादांना आशीर्वाद दिले.

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या शाळेच्या प्राचार्य किशोर सिरसाट यांनी सांगितले, “दादा नेहमीच गरिबांसाठी, शिक्षणासाठी आणि समाजसेवेसाठी कार्यरत असतात. त्यांच्या आदर्शानेच आम्ही आज हा उपक्रम राबवला. गरजूंच्या समाधानाने आम्हाला खूप मोठा आनंद मिळाला.”

या उपक्रमात सुनील सुसर, सतीश रिंढे, विष्णू काळे, राहुल देशमाने यांसह शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मनापासून सहभाग घेतला. संस्था अध्यक्षा मालतीताई शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी झाला. कर्मचाऱ्यांच्या एकजुटीने दादांचा वाढदिवस केवळ ‘केक कापण्यापुरता’ न राहता, समाजाच्या अंतिम घटकापर्यंत पोहोचला.

संदीप दादा शेळके यांचे सामाजिक कार्य, शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि गरिबांसाठी असलेली बांधिलकी यामुळे हा उपक्रम अधिक अर्थपूर्ण ठरला. जिजाऊ ज्ञान मंदिर परिवाराचा हा प्रयत्न खरोखरच प्रेरणादायी आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top